ऑस्ट्रेलिया विरुद्ध आजपासून चौथा कसोटी सामना; मोदींसह ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांची उपस्थिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीचा चौथा कसोटी सामना आजपासून सुरु होणार आहे. गुजरात येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार असून यावेळी दोन्ही देशाचे पंतप्रधानानी उपस्थिती लावली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथोनी अल्बानीज यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण स्टेडियमवर उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळालं.

नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथोनी अल्बानीज टॉस पूर्वीच मैदानावर दाखल झाले. यानंतर दोघांनीही गाडीतून संपूर्ण मैदानावर फेरफटका मारला. यावेळी दोन्ही पंतप्रधानांनी हात उंचावून प्रेक्षकांना अभिवादन केला. संपूर्ण स्टेडियमवर यावेळी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाल. क्रिकेट प्रेमींसाठी हा क्षण कधीही न विसरणार ठरणार आहे. या सामन्यातील नाणेफेकीसाठी एक खास नाणे बनवण्यात आले होते, ज्यामध्ये दोन्ही देशांच्या 75 वर्षांच्या क्रिकेट स्मृतींचे चित्रण करण्यात आले होते.

दरम्यान, भारतासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. चार कसोटी सामन्यांच्या या मालिकेत भारतीय संघ 2-1 ने पुढे आहे. परंतु आजपासून सुरु होणारा सामना भारतासाठी विशेष महत्त्वाचा असणार आहे. याचे कारण म्हणजे भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचायचे असेल तर त्याला ही कसोटी जिंकावीच लागेल. अन्यथा जर तर च्या समीकरणावर अवलंबून राहावं लागेल.