IND vs ENG 2nd T20 : Rohit Sharma ने रचला इतिहास, ‘हि’ कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या T- 20 सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत इंग्लंड समोर 170 धावांचे आव्हान ठेवले आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) व रिषभ पंत या जोडीने भारताला या सामन्यात दमदार सुरुवात करून दिली. मात्र इंग्लंडकडून पदार्पण करणारा रिचर्ड ग्लीसन याने पॉवर प्लेच्या पाचव्या षटकात रोहितची (Rohit Sharma) विकेट घेतली. त्यानंतर विराट कोहली व रिषभ पंत यांना आउट करून भारताला मोठे धक्के दिले. इंग्लंडकडून पदार्पण करणारा रिचर्ड हा तिसरा वयस्कर खेळाडू ठरला.

या सामन्याच्या पहिल्याच षटकात रोहित शर्माचा (Rohit Sharma) सोपा झेल सुटला अन् रिषभ पंत रन आऊट होता होता वाचला… जीवदान मिळाल्यानंतर दोघांनी फटकेबाजीला सुरुवात केली. पहिल्या सहा षटकांत क्षेत्ररक्षकांना असलेल्या मर्यादेचा फायदा उचलताना रोहित (Rohit Sharma) व रिषभने उत्तुंग फटके मारले. यावेळी पाचव्या षटकात पदार्पणवीर ग्लीसन गोलंदाजीला आला अन् रोहितने चौकार खेचून त्याचे स्वागत केले, परंतु पाचव्या चेंडूवर त्याने रोहितला बाद केले. बाऊंन्सवर फटका मारण्याच्या प्रयत्नात रोहित बटलरकडे कॅच देऊन बाद झाला.

रोहित शर्माने (Rohit Sharma) या सामन्यात 20 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकारांसह 31 धावा केल्या. याचबरोबर रोहितने ट्वेंटी-20 सामन्यात 300 चौकार मारणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर

सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक

2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!

संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?

Leave a Comment