नॉटिंघम : वृत्तसंस्था – इंग्लंडचा फास्ट बॉलर जेम्स अंडरसन याने आज नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये अंडरसनने केएल राहुलची विकेट घेत भारताच्या अनिल कुंबळेला मागे टाकलं आहे. जेम्स अंडरसन आता टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. अनिल कुंबळेच्या 619 विकेटच्या विक्रमाला अंडरसनने मागे टाकलं आहे. केएल राहुलला अंडरसनने 84 रनवर आऊट केलं. या अगोदर त्याने पुजारा आणि विराट कोहलीला आऊट केले आहे.
James Anderson, at 39, becomes the third-highest wicket-taker in Test cricket 🐐#ENGvIND | #WTC23 pic.twitter.com/vo874jWePa
— ICC (@ICC) August 6, 2021
टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन 800 विकेटसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर शेन वॉर्न 708 विकेटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता जेम्स अंडरसन 620 विकेटसह तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे तर अनिल कुंबळे 619 विकेटसह चौथ्या नंबरवर आहे. ग्लेन मॅकग्रा 563 विकेटसह पाचव्या नंबरवर आहे.
जेम्स अंडरसनने 26.56 च्या सरासरीने 163 मॅचमध्ये 619 विकेटचा टप्पा पार केला आहे. अंडरसनने त्याच्या टेस्ट करियरमध्ये एका इनिंगमध्ये 5 विकेट घेण्याचा पराक्रम 30 वेळा तर एका मॅचमध्ये 10 विकेट त्याने 3 वेळा घेतल्या आहेत. 42 रनवर 7 विकेट ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. 22 मार्च 2003 ला झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यातून अंडरसनने टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.