Thursday, March 30, 2023

क्रीडारत्न पुरस्काराचे नाव बदलणे म्हणजे कपडे बदलण्यासारखे चाळे करणे होय; मिटकरींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारच्यावतीने आज राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्यात आले. यावरून काँग्रेस पक्षातील नेत्यांनी आक्रमक पावित्रा घेत संताप व्यक्त केला. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी क्रीडारत्न पुरस्काराचे नाव बदलणे म्हणजे कपडे बदलण्यासारखे चाळे करण्यासारखे आहे,” असे म्हणत भाजपवर हल्लाबोल केला.

भाजपवर टीका करताना आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे की, “मेजर ध्यानचंद व स्व. राजीवजी गांधी या दोघांचेही योगदान मोदीजींच्या तुलनेत लाखपट आहे. मात्र, क्रीडारत्न पुरस्काराचे नाव बदलणे म्हणजे कपडे बदलण्यासारखे चाळे करणे असुन हा पक्ष किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो हे भारतीयांच्या लक्षात आलं असेल, असे मिटकरी यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

पंतपधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करीत पुरस्काराचे नाव बदलाच्या दिलेल्या माहितीनंतर काँग्रेस पक्षातील नेत्यांकडून याचा निषेध नोंदविण्यात आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निषेधानंतर मोदी सरकारवर काँग्रेस नेत्यांबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांकडूनही हल्लाबोल केला जाऊ लागला आहे.