IND Vs ENG Test : दुसऱ्या कसोटीमध्ये भारतीय संघात 3 मोठे बदल; या आक्रमक फलंदाजाचे पदार्पण

IND Vs ENG Test Rajat Patidar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

IND Vs ENG Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला आज सुरुवात झाली आहे. ५ कसोटी सामन्यातील पहिला कसोटी सामना भारतीय संघाने गमावला होता. त्यानंतर आज विशाखापट्टणम येथे दुसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. यावेळी संघात ३ मोठे बदल करण्यात आले असून रॉयल चॅलेंजर बंगळुरूच्या फलंदाज रजत पाटीदार याला पदार्पणाची (Rajat Patidar Debute) संधी देण्यात आली आहे.

इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत (IND Vs ENG Test) कमबॅक करण्यासाठी भारतीय संघाला हा सामना जिंकणं आवश्यक आहे. विशाखापट्टणम येथील वाय. एस. राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियमवरील या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने कुलदीप यादव, मुकेश कुमार आणि रजत पाटीदार या तिघांचा समावेश केला आहे. तर रवींद्र जडेजा, के एल राहुल आणि मोहंम्मद सिराज याना विश्रांती देण्यात आली आहे. तर दुसरीकडे इंग्लंडने सुद्धा आपल्या संघात २ बदल केले आहेत. पहिल्या सामन्यात डच्चू दिलेल्या दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसन याला आज संधी देण्यात आली आहे. त्याच्याशिवाय ऑफ स्पिनर शोएब बशीर यालाही संघात स्थान देण्यात आलेलं आहे.

कसे असतील दोन्ही संघ – IND Vs ENG Test

भारतीय संघ –

यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, श्रीकर भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मुकेश कुमार.

इंग्लंडचा संघ – जॅक क्रोली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोकस (यष्टीरक्षक), रेहान अहमद, टॉम हार्टली, शोएब बशीर, जेम्स अँडरसन.

कोणत्या टीव्ही चॅनलवर पाहू शकता सामना ?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना (IND Vs ENG Test) स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केला जाईल. येथे तुम्ही वेगवेगळ्या भाषांमध्ये सामन्याचा आनंद घेऊ शकता. याशिवाय डीडी फ्री डिश वापरणारे दर्शक डीडी स्पोर्ट्सवर सामना विनामूल्य पाहू शकतात.

सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कोठे उपलब्ध असेल?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना तुम्ही जिओ सिनेमा ॲप आणि वेबसाइटवर ऑनलाइन पाहू शकता.