हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – वेस्ट इंडिजने पहिल्या वन डे (IND vs WI ODI) सामन्यात भारताला कडवी टक्कर दिली. मात्र हा सामना भारताने 3 धावांनी जिंकला आणि या सिरीजमध्ये (IND vs WI ODI) 1-0 ने आधाडी घेतली. शिखर धवन, शुबमन गिल, श्रेयस अय्यर या आघाडीच्या फलंदाजांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली मात्र मधल्या फळीने पूर्णपणे निराशा केली. त्यामुळे आता दुसऱ्या वन डेत संजू सॅमसन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव यांच्या कामगिरीकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
या सामन्यात (IND vs WI ODI) टीम इंडियाकडून चूक झाल्याचे समोर आल्यानंतर ICC ने कारवाई केली आहे. पहिल्या वन डे सामन्यात भारताच्या 308 धावांच्या प्रत्युत्तरात विंडीजने 305 धावांपर्यंत मजल मारली होती. या सामन्यात (IND vs WI ODI) भारताने षटकांची मर्यादा संथ ठेवली आणि त्यामुळे आयसीसीने त्यांच्या मॅच फीमधील 20टक्के रक्कम दंड म्हणून वसूल केली आहे. यानंतर भारतीय संघाचा कर्णधार शिखर धवनने ही चूक मान्य केली आहे.
या सामन्यात (IND vs WI ODI) भारतीय संघाने निर्धारीत वेळेत 1 षटक कमी फेकले आणि त्यामुळे सामनाधिकारी रिची रिचर्डसन यांच्याकडून हि कारवाई करण्यात आली आहे. आयसीसीच्या नियमानुसार निर्धारित वेळेत जेवढी षटकं पूर्ण करण्यात संघ अपयशी ठरला त्यानुसार प्रती षटक 20 टक्के दंड हा खेळाडू, सहाय्यक प्रशिक्षक यांना भरावा लागतो.
हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई
धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या
Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर
हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल
INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर