Independence Day 2024 | या स्वातंत्र्यदिनी केवळ 25 रुपयात; घरबसल्या पोस्ट ऑफिसमधून ऑर्डर करा झेंडा

Independence Day 2024

Independence Day 2024 | यावर्षी भारत 15 ऑगस्ट रोजी 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. मोठ्या उत्साहाने या स्वातंत्र्य दिनाची (Independence Day 2024) तयारी देशभर होताना दिसत आहे. अगदी दोन दिवसावर आपला राष्ट्रीय सण आलेला आहे. त्यामुळे सर्वत्र देशात धामधूम चालू झालेली आहे. दरवर्षी स्वातंत्र्य दिन मोठ्या थाटात साजरा होतो. सर्वत्र झेंडे लावले जातात. त्याचप्रमाणे तिरंग्याच्या रंगाचे फुगे तसेच इतर डेकोरेशन देखील अनेक ठिकाणी होत असते. आणि शाळा कॉलेजमध्ये फडकवून स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. शाळेतील लहान मुलांना या स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगितले जाते. आपल्या देशातील ज्या लोकांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. त्यांच्या कहाण्या देखील सांगितल्या जातात.

दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी आपल्या देशाचे पंतप्रधान हे लाल किल्ल्यावर जाऊन झेंडा फडकवतात. शाळा कॉलेजमध्ये संस्थांमध्ये झेंडा फडकवण्यासोबत विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील केले जाते. या ठिकाणी देखील फडकवला जातो. यासोबतच अनेक भारतीय आपल्या घरावर देखील ध्वज फडकवतात रस्त्यावर अनेक लोक हातात झेंडा घेऊन रॅली काढताना दिसत असतात.

जर या वर्षी देखील तुम्ही तुमच्या घरावर तिरंगा फडकवण्याची खरेदी करणार असाल, तर आता तुम्ही घरबसल्याही खरेदी करू शकता. तुम्ही अगदी स्वस्तामध्ये पोस्ट ऑफिस कडून तिरंगा खरेदी करू शकता. पोस्ट ऑफिसने ही एक खास सुविधा आणलेली आहे. यासाठी तुम्ही पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन घर बसल्या तिरंगा ऑर्डर करू शकता. तुम्हाला अगदी 25 रुपयांमध्ये घरपोच हा तिरंगा मिळवून जाईल. तुम्ही तुमच्या घरावर देखील तिरंगा लावू शकता.