हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभेला उमेदवारी मिळावी म्हणून अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाची विचारसरणी, निष्ठा बाजूला ठेवून एका पक्षातून दुसऱ्या पक्षात कोलांट्या उड्या मारल्या… महायुती किंवा महाविकास आघाडी या दोघांपैकी एकाच्या छताखाली जात लोकसभेचा सेफ गेम खेळला… पण या लोकसभेत मोजक्या चार उमेदवारांनी कसलीही भीड न बाळगता स्वतंत्र राजकारण केलं. रविकांत तुपकर (Ravikant tupkar) , विशाल पाटील (Vishal Patil) , प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) , राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी लढवलेल्या जागांमध्ये नेमकं कोण जिंकतय? आघाडी आणि युतीला फाट्यावर मारून यांपैकी खासदारकीचा मान कुणाला मिळतोय? तेच पाहूया …
सांगलीचा तिढा हा लोकसभेत सर्वात जास्त इंटरेस्टिंग राहिला. विशाल पाटलांना काँग्रेसकडून तिकीट मिळण्याचे फुल चान्सेस असताना कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असं स्वतःला सेफ करत ठाकरेंनी इथून चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली… त्यामुळे नाराज झालेल्या विशाल पाटलांनी विश्वजीत कदमांच्या मदतीने दिल्लीच्या हायकमांड पर्यंत धडका मारल्या… पण उपयोग काही झाला नाही… शेवटी विशाल पाटलांनी बंड करत सांगलीतून अपक्ष लढत दिली… वंचितच्या आंबेडकरांनीही त्यांना पाठिंबा दिला… त्यामुळे सांगलीत विशाल पाटील यांच्या उमेदवारीला वजन आलं… ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील, भाजपचे विद्यमान खासदार संजय काका पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील या तीन पाटलांच्यात रंगलेल्या या खासदारकीच्या कुस्तीत विशाल पाटील आपोआपच वरचढ राहिले… वंचितचा पाठिंबा, तिकीट न मिळाल्यानं तयार झालेली सहानुभूतीची लाट, दादा पाटील घराण्याला मानणारा हक्काचा मतदार आणि काँग्रेसने आतून दिलेला मदतीचा हात यामुळे ‘नो मशाल ओन्ली विशाल’ ही घोषणा जितकी फेमस झाली तेवढाच तिचा इम्पॅक्टही सांगलीत पाहायला मिळाला… थोडक्यात हाताच्या पंजावर निवडून येऊ शकणारे विशाल पाटील इथून लिफाफ्याच्या चिन्हावर अपक्ष खासदार होतील, हे फिक्स दिसतंय…
बुलढाण्यात इंटरेस्टिंग लढत पाहायला मिळाली. ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर, शिंदेंकडून प्रतापराव जाधव तर रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यातून अपक्ष लढत दिली. प्रतापराव जाधवांच्या विरोधातील मतदारसंघातील अँटी इन्कमबन्सी, गद्दार विरुद्ध खुद्दार असं प्रचाराला दिलेलं स्वरूप आणि मराठा – कुणबी मतांचं झालेलं कन्वर्जन यामुळे खरी लढत ही नरेंद्र खेडेकर विरुद्ध रविकांत तुपकर अशी झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सर्वसामान्य शेतकरी घरातून येत शेती प्रश्नासाठी स्वतःला वाहून घेतलेला शेतकरी नेता म्हणून रविकांत तूपकरांची ओळख. शेतमालाच्या हमीभावापासून ते नुकसान भरपाईसाठी केलेल्या अनोख्या आणि हटक्या आंदोलनामुळे तुपकर हे नाव प्रत्येकाच्या घरात जाऊन पोहोचलं. बुलढाणा ही त्यांची कर्मभूमी असल्यामुळे शेतकरी, कष्टकरी आणि तरुणांचा नेता म्हणून तुपकरांची ओळख आहे. याच इमेज बिल्डिंगचा त्यांना लोकसभेत मोठा फायदा झाला… निवडणुकीत अनेक पक्षांच्या फाटाफुटी असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची नेहमी एकनिष्ठ असं स्वतःचं नरेटीव्ह तयार केल्यानं आपल्या कार्यकर्त्यांच्या जीवावर तुपकरांनी टफ फाईट दिली. पण ठाकरेंच्या नरेंद्र खेडेकर आणि रवींद्र तुपकर यांच्यातलं मतदान सध्या फिफ्टी फिफ्टी असं दिसतय. त्यामुळे बुलढाण्याचा निकाल सध्यातरी स्पष्ट सांगता येत नसला तरी तुपकर हे ठाकरेंना अनपेक्षित धक्का देऊ शकतात, एवढं मात्र निश्चित…
महाविकास आघाडीसोबत बिनसल्यापासून यंदा काहीही झालं तरी बाळासाहेबांना लोकसभेवर पाठवायचंच यासाठी वंचितची सारी यंत्रणा अकोल्यात उतरली होती. भाजपकडून अनुप धोत्रे, काँग्रेसकडून अभय पाटील तर वंचितकडून स्वतः प्रकाश आंबेडकर इथून मैदानात असल्याने वारं कुणाच्या बाजूने आहे, याचा काही अचूक अंदाज येत नव्हता… संजय धोत्रे यांच्या कारकीर्दीला जनता आधीच कंटाळली होती. त्यात अकोल्यात महायुतीची यंत्रणा विस्कटल्यामुळे प्रचार जसा पुढे सरकत गेला तसं काँग्रेसच्या अभय पाटील यांच्या बाजूने वारं झुकताना दिसलं. काँग्रेसची पारंपारिक व्होट बँक आणि त्याला महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची मिळालेली प्रामाणिक साथ यामुळे अभय पाटील अकोल्याच्या निकालात पुढे निघून गेलेत, असं सगळेच बोलू लागलेत. आंबेडकरांना मोठं मतदान एकगठ्ठा होईल हे जरी खरं असलं तरी विजयाचं मार्जिन तोडेल इतकं ते जास्त नसेल… थोडक्यात आंबेडकरांचा यंदाही खासदारकीचा चान्स हुकतोय, अशी एकूणच परिस्थिती आहे…
2009 ला नुकत्याच तयार झालेल्या हातकणंगले मतदारसंघातून अपक्ष निवडून येत राजू शेट्टी यांनी आपली ताकद दाखवून दिली. साखर आणि सहकार पट्टयाचं राजकारण करत शेतकरी नेता म्हणून शेट्टींनी महाराष्ट्रात इमेज तयार केली. त्यांची अनेक आंदोलनं ही सरकारच्या अनेक निर्णयातील मैलाचा दगड ठरली. हाच कित्ता 2014 ला गिरवत ते पुन्हा खासदार झाले… पण 2019 ला शिवसेनेच्या धैर्यशील माने यांनी राजू शेट्टींचा पराभव करत मतदारसंघात त्यांना बॅकफुटला टाकलं. पण 2024 च्या सध्या पार पडलेल्या निवडणुकीत हातकणंगले राजकारणाचा हॉटस्पॉट ठरला… राजू शेट्टींनी हातकणंगलेतून महाविकास आघाडीने आपल्याला पाठिंबा द्यावा, अशी मागणी केली. पण मशाल चिन्हावर निवडणूक लढवण्याची अट घातल्याने प्रस्ताव बारगळला आणि शिट्टी अपक्ष लोकसभेच्या मैदानात उतरले… शिंदे गटाकडून धैर्यशील माने, ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील तर वंचितनंही आपला उमेदवार मैदानात उतरवल्याने हातकणंगलेत मतदानाच्या दिवशी बरीच घासाघीस झाली. महाविकास आघाडी बनल्यापासून मतदारसंघातील राजू शेट्टी यांची क्रेझ कमी झाली, वंचितचाही म्हणावा असा प्रभाव लोकसभेला दिसला नाही, धैर्यशील मानेंच्या विरोधात त्यांच्या पक्षांतर्गत आणि मित्र पक्षांकडून असणारा तक्रारीचा सूर पाहता इथे ठाकरेंच्या सत्यजित पाटील यांच्या विजयाचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे राजू शेट्टी यांचं पुन्हा एकदा लोकसभेत जाण्याचं स्वप्न स्वप्नच राहील, अशी चर्चा आहे…
थोडक्यात विशाल पाटील आणि रविकांत तुपकर या दोघांनाही अपक्ष म्हणून खासदार होण्याचे इक्वल चान्स आहेत. त्यामुळे आता 4 तारखेला हा अंदाज खरा ठरेल की काही अनपेक्षित धक्के आपल्याला पाहायला मिळतील. हे येणारा काळच सांगेन. बाकी अपक्ष म्हणून महाराष्ट्रातून कोणते खासदार दिल्लीत जातील? तुमचा अंदाज काय सांगतो? आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. अ