मोठी बातमी!! INDIA आघाडीची नितीशकुमारांना पंतप्रधान पदाची ऑफर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणीत NDA ला काठावरच बहुमत मिळाल्याने एकेकाळचे इंडिया आघाडीचे मित्र असलले नितीशकुमार आणि चंद्रबाबु नायडू यांचं महत्व वाढलं आहे. या नेत्यांनी पुन्हा आपल्याकडे यावं म्हणून इंडिया आघाडीच्या नेत्यांनी प्रयत्न केले होते. मात्र तरीही या दोन्ही नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपलं समर्थन दिले. याच दरम्यान, जेडीयूचे नेते केसी त्यागी यांनी एक मोठं विधान करत खळबळ उडवुन दिली आहे. इंडिया आघाडीने नितीशकुमार याना पंतप्रधान पदाची ऑफर (Nitishkumar PM Offer By INDIA Alliance) दिली होती. मात्र त्यांनी ती धुडकावून लावल्याचे केसी त्यागी यांनी म्हंटल आहे.

एका वृत्तपत्राशी बोलताना केसी त्यागी म्हणाले, निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर नितीश कुमारांना इंडिया आघाडीच्या नेत्यांनी पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, पण त्यांनी ती नाकारली. इंडिया आघाडीचे संयोजक पद देण्यासाठी काँग्रेसने कुरकुर केली आणि आता नितीश कुमार यांना पंतप्रधान पद द्यायला निघालेत. खरं तर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी नितीश कुमार यांना दिलेल्या वाईट वागणुकीमुळे त्यांनी विरोधकांशी संबंध तोडले आहेत. तर दुसरीकडे मात्र भाजप जेडीयूला मान देत आहे असं त्यांनी म्हंटल.

दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. नितीशकुमार यांचं जेडीयूचे 12 आणि चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीच्या १६ खासदारांच्या पाठिंब्यावर मोदी सरकार तरल आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांना इंडिया आघाडीकडे खेचून मोदी सरकार पाडण्याचा इंडिया आघाडीचा डाव होता. मात्र नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी मात्र मोदींना आपला जाहीर पाठिंबा दिल्याने इंडिया आघाडीचे मनसुबे धुळीला मिळाले. या दोन्ही नेत्यांनी भाजपला समर्थन दिल्याने इंडिया आघाडीला पुनः एकदा विरोधात बसावं लागणार आहे.