Viral Photo : मन कि बात!! भररस्त्यात उभ्या युवकाच्या हातातील ‘पाटी’वरचा संदेश वेधतोय तरुणांचं लक्ष

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Photo) आजकाल सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी बरेच लोक वेगवेगळ्या युक्त्या लढवताना दिसतात. डान्स, स्टंट, जुगाड हे तर रोजच झालं आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चेत असतात त्या पुणेरी पाट्या, जाहिरातींचे फोटो आणि हटके डायलॉगबाजी. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंमधील पाट्यांचे नेटकऱ्यांनासुद्धा विशेष आकर्षण वाटते. कारण, यावर लिहिलेला आशय हा अत्यंत लक्षवेधी असतो. आताही सोशल मीडियावर एका तरुणाचा फोटो व्हायरल होतो आहे. भररस्त्यात उभ्या असलेल्या या तरुणाच्या हातात एक पाटी आहे आणि यावर लिहिलेला मजकूर वाचून बऱ्याच तरुण मुलांना मन की बात बोलल्याचं फिलिंग येणार आहे.

काय आहे मजकूर? (Viral Photo)

सोशल मीडियावर जो फोटो व्हायरल होतो आहे. त्यामध्ये एक तरुण मुलगा भररस्त्यात हातामध्ये पाटी घेऊन उभा असल्याचे दिसत आहे. त्याच्या हातातील पाटीवर एक मजकूर लिहिला आहे. तो मजकूर असा आहे की, ‘भावा, तू तिला कितीही रंग लाव, पण एक दिवस ती तुझं आयुष्य बेरंग करणार’. हा तरुण या मजकुरातून अनेक तरुण मुलांना मोफत सल्ला देताना दिसतोय. बऱ्याचदा तारुण्यात झालेलं प्रेम वचनांचा पलीकडे जात. बरेच लोक अगदी झोकून प्रेम करतात आणि ८ – १० वर्ष रिलेशनशिपमध्ये राहतात.इतकी वर्ष होऊन गेल्यानंतर अचानक त्यांना हे नातं टिकणार नाही याची उपरती होते. त्यामुळे कस्मे- वादे अपूर्णच राहतात. यात चूक दोघांची किंवा एका कुणाची असू शकते. पण नातं तुटतं हे महत्वाचं. अशा ब्रेकअप्सवर बरीच हिंदी, मराठी गाणीसुद्धा आहेत. पण तरीही अशा व्हायरल पाट्या कायम लक्षवेधी ठरतात. (Viral Photo) आताही सोशल मीडियावर या तरुणाच्या मोफतर सल्ला पाटीचा फोटो तुफान व्हायरल होतो आहे. जो पाहून काहींना हसू थांबवता येत नसेल तर काहींना अचानक अपूर्ण राहिलेल्या प्रेमाची आठवण झाली असेल.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

हा व्हायरल फोटो सोशल मीडिया हॅन्डल इंस्टाग्रामवर ag_creation_004 नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. सोबत कॅप्शनमध्ये, ‘भाऊ जरा जास्तच खरं बोलला’ असं लिहिलं आहे. या फोटोला आतापर्यंत दीड लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी हा फोटो शेअर सुद्धा केला आहे. (Viral Photo) यावर बऱ्याच तरुण मंडळींनी विविध मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलंय, ‘रंग नाही चुना लावणार..’. तर आणखी एकाने लिहिलंय, ‘मन कि बात.. खरंच.. बेरंग करून गेली यार!!’ तर आणखी एकाने लिहिलंय, ‘तिने पाहिलं तर ब्रेकअप होईल रे..’