गलवान खोरं आमचंच, तुम्ही तुमच्या सैनिकांना ताब्यात ठेवा! चीनची दर्पोक्ती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांच्या सैन्यांमध्ये हिंसक झडप झाल्यानंतर चीनकडून कांगावे करण्यात आले. तणाव विकोपाला गेलेला असतानाही चीनकडून त्यांची भूमिका मात्र बदलल्याचं दिसत नाही आहे. बुधवारी घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेच चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियन (Zhao Lijian) यांनी देशाच्या भूमिका मांडतांना गलवान खोरं(Galwan Valley) हे कायमच चीनचं होतं, असा दावा केला. गलवान खोऱ्यातील चकमकीसाठी चीनला जबाबदार धरु नका, या आपल्या वक्तव्याचा झाओ लिजियन यांनी पुनरुच्चार केला. सीमेवरील परिस्थिती आता स्थिर आणि नियंत्रणात असल्याचा दावाही त्यांनी केला.

चीनच्या बाजूला किती नुकसान झाले याबद्दल झाओ लिजियन यांनी माहिती देण्याचे टाळले. नेहमीच उलटया बोंबा मारणाऱ्या चीनने पुन्हा एकदा भारतावरच आरोप केला. “भारतीय सैनिक सीमा ओलांडून चीनच्या हद्दीत घुसले व हल्ला केला. यामुळे दोन्ही बाजूच्या सैनिकांमध्ये हाणामारी होऊन काही मृत्यू झाले व काही जखमी झाले” असे झाओ लिजियन यांनी सांगितले. नेमकी किती जिवीतहानी झाली. त्याबद्दल त्यांनी काहीही माहिती दिली नाही.

दरम्यान, सध्याच्या घडीला भारतीय सैन्यानं सीमारेषेवरील जवानांना ताब्यात ठेवत उद्युक्त करणाऱ्या कारवाया बंद करण्याची विचारणा भारताकडे केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. चर्चा आणि विचारविनिमयाच्या माध्यमातून या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आपली तयारी चीननं दाखवली. यामध्ये भारतानं गलवान मुद्द्यावर एकतर्फी निर्णय घेऊ नये या भूमिकेवरही चीन वारंवार येत असल्याचं दिसून आलं. तेव्हा आता चर्चा आणि संवादाच्या बळावर गलवान खोऱ्याची हिंसक झडप आणि चीनसोबत असणाऱ्या सीमावादाच्या मुद्द्यावर भारत नेमका कोणता निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment