नवी दिल्ली । देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असल्याचं चित्र समोर येत आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. दरम्यान, भारतात गेल्या २४ तासांमध्ये देशात ६७ हजार १५१ नव्या रुणांची नोंद झाली असून १ हजार ५९ रुग्णांचा मृत्यू झाला. तर देशात एकूण ३२ लाख ३४ हजार ४७५ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर ५९ हजार ४४९ रुग्णांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
अशा कठीण प्रसंगी दिलासा देणारी बाब म्हणजे देशात ज्या वेगात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्याहूनही अधिक वेगात रुग्ण कोरोनावर मात करत आहेत. सध्या देशात ७ लाख ७ हजार २६७ रुग्णांवर उपचार सुरू असून २४ लाख ६७ हजार ७५९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना व्हायरचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंगळवारी देशात ८ लाख २३ हजार ९९२ चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर संपूर्ण देशात आता पर्यंत ३,७६,५१,५१२ चाचण्या करण्यात आल्या आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”