नवी दिल्ली । पंजाब नॅशनल बँक (PNB Scam) घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोकसीला (Mehul Choksi) भारतात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. सध्या तो डोमिनिकाच्या (Dominica) तुरूंगात आहे. आपले अपहरण आणि हत्येच्या प्रयत्नासंदर्भात चोकसीने मोठा कट रचल्याचा दावा केला होता. आता डोमिनिकन पंतप्रधान रूझवेल्ट स्कर्ट (Dominican Prime Minister Roosevelt Skerrit) यांनी चोक्सीच्या दाव्यांना मूर्खपणाचे असल्याचे म्हटले आहे.
डोमिनिका न्यूज ऑनलाईनच्या वृत्तानुसार Skerrit यांनी गुरुवारी सांगितले की,”मेहुल चोकसीचा डोमिनिका, भारत, अँटिगा-बार्बुडा यांच्यात झालेल्या कट रचनेचा एक भाग म्हणून आयलंडवर आणण्याचा दावा पूर्णपणे खोटा आणि मूर्खपणाचा आहे. मेहुल चोकसीची ही केवळ एक कल्पना आहे.”
अपहरणनाट्यात अर्थ नाही
मेहुल चोकसी आणि त्याच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपावर डोमिनिकाचे पंतप्रधान रूझवेल्ट स्कर्ट यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली. चोकसी आणि त्याच्या पत्नीने असा आरोप केला होता की,” डोमिनिका, भारत आणि अँटिगा-बार्बुडा या सरकारांनी चोकसीला भारतात आणण्यासाठी आणि त्याच्या 13500 कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याबद्दल खटला भरण्यासाठी हा कट रचला होता.”
स्कर्ट म्हणाले, “डोमिनिका सरकारचा भारत आणि अँटिगा सरकारशी काही संबंध आहे हा आरोप पूर्णपणे निराधार आहे. कृपया याचा शेवट करा. आम्ही अशा कामांतमध्ये कधीही सहभाग घेणार नाही. नक्कीच नाही. म्हणजे ते मूर्खपणाचे आहे आणि आम्ही ते नाकारतो.”
विरोधकांनी बेजबाबदार विधाने करू नये
पंतप्रधान रूझवेल्ट स्कर्ट यांनीडोमिनिकामधील विरोधी पक्षांनाही या विषयावर “बेजबाबदार विधाने” न करण्याची विनंती केली. डोमिनिकाचे विरोधी पक्षनेते लेनोक्स लिंटन यांनी गेल्या महिन्यात चोकसीच्या अपहरणात सरकारची भूमिका असल्याचा आरोप केला होता. पंतप्रधान स्कर्ट यांनी हे अधोरेखित केले की,” त्यांचे सरकार कायद्याची समानपणे अंमलबजावणी करेल. जरी एखाद्यावर कोणत्याही गुन्हा केल्याचा आरोप असेल.”
चोकसीच्या हक्कांचा आदर केला जाईल
यापूर्वी 23 मे रोजी डोमिनिकामध्ये पकडल्यानंतर पंतप्रधान स्कर्ट यांनी पहिल्यांदाच जाहीर निवेदन केले होते की, “मेहुल चोकसीच्या हक्कांचा सन्मान केला जाईल.” स्थानिक मीडियाकडे चोकसीच्या संदर्भात पंतप्रधानांनी सांगितले की, पुढे काय कारवाई होईल याचा निर्णय कोर्ट घेईल.”
त्याच्या अपहरणाबाबत सांगितले
मेहुल चोकसीच्या लीगल टीमने असा आरोप केला आहे की, 23 मे रोजी अँटिगा आणि भारतात पोलिस अधिकाऱ्यांनी त्याला पळवून नेले होते. दुसर्या दिवशी त्याला बोटीद्वारेडोमिनिका येथे आणले गेले, तेथे डोमिनिकाच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. हे सर्व त्याला शांतपणे भारतात निर्वासित करण्याचा कट होता.
कथित गर्लफ्रेंडवरही आरोप ठेवण्यात आले होते
मेहुल चोकसीने यापूर्वी असा आरोप केला आहे की, त्याच्या अपहरणात त्याची कथित गर्लफ्रेंड बार्बरा जबरिकाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. यात अँटिगा पोलिस कर्मचारी असल्याचा दावा करणारी लोकं आणि भारतीयांसारखे दिसणारी लोकं यांचा समावेश होता. 13,500 कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याप्रकरणी भारतास हवा असलेल्या फरार मेहुल चोकसीला अँटिगा आणि बार्बुडा येथून रहस्यमय बेपत्ता झाल्यानंतर 23 मे रोजी अटक करण्यात आली होती.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा