Monday, February 6, 2023

संजय राऊतांना भाजपवर आरोप केल्याशिवाय जेवणच पचत नाही; फडणवीसांचा टोला

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांमागे ईडी चौकशी सुरू करण्यात आल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधला होता. त्यावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, संजय राऊत भाजपवर रोज काही ना काही आरोप करत असतात. त्यांना भाजपवर आरोप केल्याशिवाय जेवणच पचत नाही, असा टोला फडणवीस यांनी लगावला तसेच ईडीच्या माध्यमातून सत्तांतर घडविण्यात येत असल्याच्या वार्ता केवळ आरोप असल्याचेही ते म्हणाले.

- Advertisement -

संजय राऊत काय म्हणाले –

ईडी, सीबीआयचा हा वापर हा तर पाठीतला वार आहे. मी कोणत्याही पक्षाचं नाव घेणार नाही. पण राज्याला हे शोभा देत नाही अस म्हणत  हे निर्मळ राजकारण नाही. आमने सामने लढाई करावी. ही महाराष्ट्राची परंपरा नाही.असे संजय राऊत यांनी म्हंटल.