Sunday, April 2, 2023

भारतीय लोकशाही घसरली, 10 व्या स्थानावरून थेट 51 व्या स्थानी घसरण

- Advertisement -

टीम हॅलो महाराष्ट्र । लोकशाही सूचकांकाच्या जागतिक क्रमावारीत दहाव्या स्थानी असलेला भारताची थेट ५१व्या स्थानी घसरण झाली आहे. ‘द इकनॉमिस्ट इंटेलिजन्ट्स यूनिट’ने (ईआययू) २०१९ साठीचा हा अहवाल जारी केला असून त्यात भारतातील लोकशाही सदोष असल्याचं म्हटलं आहे. भारतात नागरी स्वातंत्र्यामध्येही घसरण झाल्याचा दावा ईआययूने केला आहे.

ईआययूकडून दरवर्षी हा अहवाल जारी करण्यात येत असून जगभरातील १६५ स्वतंत्र देश आणि दोन क्षेत्रातील लोकशाहीची सद्यस्थितीचा अभ्यास करून हा अहवाल प्रसिद्ध करण्यात येतो. यंदा प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात लोकशाही सूचकांकामध्ये भारत दहाव्या स्थानावरून ५१व्या स्थानावर गेला आहे. देशातील नागरिक स्वातंत्र्याच्या ऱ्हासामुळे भारताची घसरण झाल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

- Advertisement -

लोकशाही सूचकांकाच्या यादीत चीन १५३व्या स्थानी असून वैश्विक रँकिंगमध्ये चीन सर्वात खालच्या स्तरावर आहे. तर विकसनशील अर्थव्यवस्था असलेल्या ब्राझिलने या यादीत ५२वं स्थान पटकावलं आहे. तर रशिया १३४व्या स्थानी असून पाकिस्तानला १०८ व्या स्थानी समाधान मानावं लागलं आहे. श्रीलंका ६९व्या, बांगलादेश ८० व्या आणि उत्तर कोरिया १६७ व्या स्थानी असून नॉर्वे सर्वोच्च स्थानी आहे.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा-

नसरुद्दिन शहांनी ‘जोकर’ म्हटल्यावर अनुपम खेर संतापले; व्हिडिओद्वारे दिलं सडेतोड उत्तर

पंतप्रधान मोदींचा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर विश्वास नाही काय?, नसेल तर त्यांना हटवा – काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हण

चीनचा ‘कोरोनाव्हायरस’ जगभर पसरतोय; आतापर्यंत घेतले ४०० बळी, काय आहे ‘कोरोनाव्हायरस’? जाणून घ्या