देशात कोरोना रुग्णवाढीचा नवा विक्रम; २४ तासांत सापडले कोरोनाचे २२ हजारापेक्षा जास्त रुग्ण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशात शनिवारी कोरोना नव्या रुग्णांवाढीचा संख्येचा नवा उच्चांक नोंदवला गेला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे २२ हजार ७७१ रुग्ण आढळून आले आहेत. एकाच दिवसात आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. तर गेल्या २४ तासांत देशात ४४२ जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६ लाख ४८ हजार ३१५ वर जाऊन पोहोचली आहे. यापैकी २ लाख ३५ हजार ४३३ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर ३ लाख ९४ हजार २२७ जण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर देशातील एकूण मृतांचा आकडा १८ हजार ६५५ इतका आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही जास्त आहे. सध्याच्या घडीला देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६०.८० टक्क्यावर जाऊन पोहोचले आहे.

महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य आहे. शुक्रवारी महाराष्ट्रात सर्वाधिक ६३६४ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर १९८ जणांचा मृत्यू झाला. तर मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा ८२,०७४ वर जाऊन पोहोचला आहे. महाराष्ट्रातील मृत्यूदर ४.३४% एवढा आहे. मात्र, रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ५४.२४% टक्के आहे. शुक्रवारी महाराष्ट्रातील ३५१५ रुग्णांना घरी सोडण्यात आले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment