नवी दिल्ली प्रतिनिधी | भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचे कारण वाढले आहे. पुलवामा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारताने बालाकोट परिसरात केलेल्या एअर स्ट्राईक यामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांत दोन्ही बाजूंनी सीमेवर सैन्याची जमवाजमव सुरु आहे.
पाकिस्तानने सीमारेषेलगत असणारे दहशतवाद्यांचे तळही केंद्रीय प्रशासनाच्या अखत्यारित असणाऱ्या भागात हलवण्यात आल्याचे समजते. यामुळेभारतीय लष्कराच्या हालचालींनाही वेग आला आहे. यासाठी आगामी काळात युद्ध झाल्यास वायूदलाची भूमिका महत्त्वाची ठरू शकते.त्यासाठी विमानांना मोठ्याप्रमाणावर दारुगोळ्याची गरज आहे.
वायूदलच्या ताफ्यात असणारी क्षेपणास्त्रे बऱ्याच काळापासून पडून आहेत, त्यामुळे त्यांची क्षमता ध्यानात घेऊन नवीन क्षेपणास्त्रे खरेदी करण्याची गरज आहे. प्रामुख्याने हवेतून हवेत मारा करु शकणाऱ्या क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी त्याचा खूप मोठा उपयोग होऊ शकतो. पाकिस्तानच्या हालचाली लक्षात घेता भारताने सीमारेषेवर मिराज-२००० आणि सुखोई ३० एमकेआय ही विमाने तैनात केलीआहेत.
इतर महत्वाचे –
अमरावतीतून लढणाऱ्या ‘या’ उमेदवाराच्या प्रचाराला शरद पवार हजेरी लावणार
भाजपच्या पराभवासाठी अनिल गोटेंनी घेतली पवारांची भेट…