पहलगाम हल्ल्यानंतर भारत ऍक्शन मोडवर; ‘या’ पाकिस्तानी चॅनेल्सवर बंदी

youtube
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन येथे अनेक पर्यटक मारले गेले. या हल्ल्यामुळे सर्व देशभरात निषेध व्यक्त केला जात आहे. या हल्ल्याची दखल घेऊन भारत सरकारने कठोर पावले उचललेली आहेत. सरकारने पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये काही प्रसारमाध्यमांचे चॅनेल्स अन काही लोकप्रिय यूट्यूबर्सचाही समावेश आहे. ही कारवाई केंद्र सरकारने गृह मंत्रालयाच्या शिफारशीनंतर केली आहे. तर ते कोणते चॅनेल्स आहेत याची माहिती आपण घेणार आहोत.

पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल्सवर बंदी –

सरकारने यापूर्वीही 30 हून अधिक चॅनेल्सवर बंदी घातली होती. अन आताही भारत सरकार ऍक्टिव मोडमध्ये आले आहे. आताही त्यांनी काही ठराविक चॅनेल्सवर बंदी घातली आहे, त्याची यादी पुढीलप्रमाणे –

जिओ न्यूज

डॉन न्यूज

समा टीव्ही

बोल न्यूज

जीएनएन

समा स्पोर्ट्स

उजैर क्रिकेट

उमर चीम एक्सक्लूसिव

आरजू काजमी

शोएब अख्तर (माजी क्रिकेटपटू आणि समालोचक)

इरशाद भट्टी

एजारवई न्यूज

रफ्तार

पाकिस्तान रेफरन्स

आसमा शिराजी

मुनीब फारूक

सुनो न्यूज एवढी

राजी नामा

यूट्यूब चॅनेलवरही परिणाम –

या बंदीमुळे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याच्या यूट्यूब चॅनेलवरही परिणाम झाला आहे. तसेच पत्रकार आरजू काजमी आणि सय्यद मजम्मिल शाह यांच्या चॅनेल्सवरही भारतात प्रवेश बंद करण्यात आला आहे. या प्रकरणातून स्पष्ट आहे की भारत सरकार देशाच्या सार्वभौमत्वाशी संबंधित मुद्द्यांवर कोणतीही तडजोड न करता कडक कारवाई करत आहे. सामाजिक माध्यमांवरून होणारा अपप्रचार आणि धार्मिक तेढ वाढवणारे संदेश यावर सरकार कटाक्ष ठेवून आहे.