Satara News: घरात फटाके टाकल्याचा जाब विचारल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | घरात फटाके टाकल्याचा जाब विचारल्याच्या रागातून एका युवकावर भर चौकात कोयत्याने खुनी हल्ला केल्याने कराड शहरात एकच खळबळ उडाली. या हल्ल्यात ओम गणेश बामणे (रा. शिंदे गल्ली) हा युवक जखमी झाला आहे. उपचारासाठी त्याला वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या प्रकरणी हल्लेखोरांमधील एका संशयितास पोलिसांनी धाडसाने त्याच्याकडील … Read more

खुन्नसीच्या कारणावरून पहाटेच्यावेळी जमावाकडून तलवारीने कुटुंबावर हल्ला : 11 जणांवर गुन्हा

Karad Taluka Police Station

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराड तालुक्यात किरकोळ कारणांवरून तलवार, कुऱ्हाड आणि कोयत्यासारख्या धारदार शस्त्रांचा वापर करून हल्ले केले जात आहेत. अशा हल्ल्याच्या घटनांमध्ये सध्या वाढ होत असल्याचे दिसते. कराड तालुक्यातील विरवडे येथे खुन्नस दिल्याच्या कारणावरून जमावाने एका कुटुंबाच्या घरावर हल्ला केल्याची घटना सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. तलवार, कोयता, लाकडी दांडक्यांनी केलेल्या मारहाणीत तिघे जण जखमी … Read more

काटवलीतील जंगली श्वापदाच्या हल्ल्यात भेकराचा मृत्यू

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके जावळी तालुक्यातील तोरणपेढा येथील शिवारात होळीच्या दिवशी रात्री जंगली श्वापदाच्या हल्ल्यात भेकरावर प्राणघातक हल्ला केल्याने त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. या हल्ल्याची घटना काटवली (ता. जावळी) येथील डोंगर परिसरात घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, काटवली (ता. जावळी) येथील डोंगर परिसरात तोरणपेढा शिवारात होळीच्या रात्री एका भेकराची शिकार वन्य श्वापदांकडून झाली. … Read more

पुलवामामध्ये पुन्हा दहशतवाद्यांचा हल्ला ! गोळीबारात काश्मिरी पंडिताचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काश्मीर खोऱ्यात पुलवामामध्ये सध्या दहशतवाद्यांचे वास्तव्य वाढले आहे. दरम्यान दहशतवाद्यांनी आज पुन्हा हल्ला केला. यावेळी काश्मिरी पंडित संजय शर्मा यांच्यावर गोळीबार केला असून त्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. संजय शर्मा यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, पुलवामामध्ये अचन भागात राहणारे संजय शर्मा … Read more

पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय मंत्र्याच्या ताफ्यावर हल्ला

Nisith Pramanik Convoy Attack

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम बंगालमध्ये भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री निसिथ प्रामाणिक यांच्या ताफ्यावर हल्ला केल्याची नुकतीच धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, केंद्रीय गृह, क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक हे कुचबिहार येथील दिंहाता येथे कार्यकत्यांची भेट घेण्यासाठी निघाले होते. यावेळी त्यांच्या ताफ्यावर अज्ञात … Read more

धक्कादायक! जमिनीच्या वादातून काका आणि चुलतभावावर प्राणघातक हल्ला

Attack

यवतमाळ : हॅलो महाराष्ट्र – राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत जागेच्या घरगुती कारणांवरून (Attack) एकाचा खून करण्यात आला तर या घटनेत एक जण गंभीर जखमी (Attack) झाला आहे. काय आहे नेमके प्रकरण? यवतमाळ शहरातील पांढरकवडा रोडवरील हिंदू स्मशान भूमीमध्ये एक धक्कादायक … Read more

फोनवर मोठ्याने बोलल्याच्या कारणावरून दोघांवर जिवघेणा हल्ला

navi mumbai crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवी मुंबईतील कोपर खैरणे येथील एका हॉटेलमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये नवी मुंबईच्या कोपर खैरणेमधील हॉटेलमध्ये एका टेबलवर दोन व्यक्ती तर बाजूच्या टेबलवर 12 जण जेवण करण्यासाठी बसले होते. त्यातील 12 जणांच्या टोळीमधील एकाला फोन आला, त्यावेळी त्यांनी मोठ्याने बोलणे आणि अश्लील शिवीगाळ सुरू केली. यानंतर त्यांच्या या मोठमोठयाने बोलण्यावर … Read more

अभियंता हल्ला प्रकरणात एक वर्षाने पत्नीलाच अटक

Police Station Aundh

सातारा | वाहनाचे ऑईल गळत आहे, असे म्हणत डोळ्यात चटणी टाकून मोबाईल हिसकावून घेऊन कनिष्ठ अभियंता दिलीप महादेव माळी यांना अज्ञात दोन चोरट्यांनी एका वर्षापूर्वी मारहाण केली होती. याप्रकरणी तीन संशयितांना औंध पोलीसांनी मोबाईल लोकेशनद्वारे अटक केली असून अभियंता दिलीप माळी यांच्या पत्नीला अटक केली आहे. याबाबतची माहिती अशी, गोपूज कारखान्याजवळ असलेल्या पेट्रोल पंपानजीक 28 … Read more

गव्याने 60 वर्षीय वृध्दाचे काळीजच फाडले : पांढरेपाणी गावाला काळ्या पाण्याची शिक्षा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मोरणा विभागातील पश्चिमेला अतिदुर्गम ठिकाणी वसलेल्या पांढरेपाणी गावातील 60 वर्षीय वृद्धावर गव्याने हल्ला करून काळीज फाडून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. या वृध्दाला उपचारासाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखले केले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमीला जीव धोक्यात घालून वाहत्या पाण्यातून डोलीत बसवून 2 तास पळवत आणून 6 ते 7 … Read more

साताऱ्यात किरकोळ वादातून तरूणावर कोयत्याने वार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके साताऱ्यातील शनिवार पेठ येथे असलेल्या वाघाच्या नळी परिसरामध्ये किरकोळ कारणाच्या वादातून मल्हारपेठ येथे राहणाऱ्या रोहित सोनटक्के या तरुणावर कारंजे येथील एका तरुणाने जमावाच्या मदतीने कोयत्याने हातावर वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली. याबद्दलची तक्रार रोहित सोनटक्के याने साताऱ्यातील शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. सदरच्या हल्ल्यामध्ये रोहित सोनटक्के … Read more