हॅलो महाराष्ट ऑनलाईन । महाराष्ट्र आणि मुंबईसाठी अतिशय दुःखद अशी बातमी आहे. पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात (India Pakistan War) मुंबईचे जवान एम. मुरली श्रीराम नाईक यांना वीरमरण आले आहे. जम्मू काश्मीरजवळ पाकिस्तानच्या हल्ल्यात ते शहीद झाले. मुरली नाईक हे घाटकोपरच्या कामराज नगर येथील रहिवासी असून,ते मूळचे आंध्र प्रदेशचे होते. मुरली नाईक यांच्यासोबत भारतीय सैन्याचे दुसरे जवान दिनेश शर्मा यांनाही पूँछ सेक्टरमध्ये पाकिस्तानशी लढताना वीरमरण प्राप्त झाले. गोळीबारात जखमी झाल्यानंतर शर्मा यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचं दुर्दैवी निधन झालं. भारत – पाकिस्तान बॉर्डरवर अजूनही गोळीबार सुरूच असून परिस्थिती गंभीर झाली आहे.
मुंबईतील कामराज नगरच्या झोपडपट्टीमध्ये राहत होते मुरली नाईक- India Pakistan War
आज 9 मे रोजी पहाटे 3.00 वाजता झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान (India Pakistan War) मुरली नाईक यांना वीरमरण आहे. आंध्र प्रदेशचे रहिवासी असलेले मुरली नाईक यांचे कुटुंब हे मुंबईतील कामराज नगरच्या झोपडपट्टीमध्ये राहत होते. मात्र, काही दिवसांपूर्वी सदरची झोपडपट्टी पुनर्विकासात गेल्याने त्यांची घरे तोडण्यात आली होती. त्यामुळे, सध्या नाईक यांचे कुटुंब आंध्र प्रदेशाला राहण्यास गेले आहे. मात्र तरीही मुंबईतील घाटकोपर वार्ड क्रमांक 133 मध्ये मुरली नाईक यांच्या शहीद झाल्याचे बॅनर लावण्यात आले आहेत. आसपासच्या स्थानिकांकडून मुरली नाईक याना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. मुरली यांच्या निधनाची बातमी ऐकताच त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या बलिदानामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
దేశ రక్షణలో శ్రీ సత్యసాయి జిల్లా, పెనుకొండ శాసనసభ నియోజకవర్గం, గోరంట్ల మండలానికి చెందిన మురళి నాయక్ అనే సైనికుడు ప్రాణాలు కోల్పోవడం విషాదకరం. దేశం కోసం ప్రాణాలర్పించిన అమరవీరుడు మురళి నాయక్ కు నివాళులు. ఆయన కుటుంబ సభ్యులకు ప్రగాఢ సానుభూతిని తెలియజేస్తున్నాను. pic.twitter.com/QGtIAxMjug
— N Chandrababu Naidu (@ncbn) May 9, 2025
नाईक यांच्या वीरमरणानंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ट्वविट करुन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुरली नाईक हे सत्यसाई जिल्ह्यातील गोरंटला तालुक्यातील रहिवाशी होते. देशासाठी बलिदान देणाऱ्या मुरली नाईक यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो, नाईक कुटुंबीयांप्रती सहवेदना आहेत, असे ट्वविट चंद्राबाबू नायडू यांनी केले आहे.




