नवी दिल्ली । भारतात कोरोना रुग्ण वाढीचे प्रमाण अद्यापही कमी होताना दिसत नाही आहे. चिंताजनक बाब म्हणजे २८ जुलैपासून देशामध्ये दररोज ५० हजारपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. काल बुधवारी एकाच दिवसात तब्बल ५६ हजार २८२ नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या १९ लाख ६४ हजार ५३७ पर्यंत पोहोचली आहे. करोनामुळे आतापर्यंत देशात ४० हजारपेक्षा जास्त नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
देशभरातील राज्याचा आकडेवारीवर नजर टाकल्यास, महाराष्ट्र (४,६८,२६५), तामिळनाडू (२,७३०००), आंध्र प्रदेश (१,७६,३३३), कर्नाटक (१,५००००) आणि दिल्ली (१,४०,२३२) या पाच राज्यांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला आहे. करोनामधून बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील लक्षणीय आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार आतापर्यत १२ लाख ८२ हजार २१५ कोरोनापासून बरे झाले आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”