देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत उचांकी वाढ; गेल्या २४ तासांत ३२ हजार ६९५ रुग्ण आढळले 

0
28
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारतामध्ये दररोज कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत प्रचंड वेगाने वाढ होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार मागील २४ तासांत ३२ हजार ६९५ रुग्ण आढळले असून, भारतातील एकूण रुग्णसंख्या ९ लाख ६८ हजार ८७६ वर पोहोचली आहे. गेल्या ८ दिवसांत २५ हजारांनी वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आज ३२ हजारांपेक्षा जास्त रुग्णांनी वाढली आहे. ८ दिवसांत २ लाख रुग्णांची संख्या वाढली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात आणि मध्य प्रदेश मध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात वाढत आहे.

दिलासादायक बाब म्हणजे देशभरात मागील २४ तासांत आणखी २० हजार ५७२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत ६ लाख १२ हजार ८१५ रुग्ण बरे झाले आहेत. देशात एकूण ३ लाख ३१ हजार १४६ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. बरे होणाऱ्यांचे राष्ट्रीय सरासरी प्रमाण ६३.२४ टक्क्यांवर पोहोचले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

देशभरात गेल्या २४ तासांमध्ये ६०६ मृत्यू झाले असून, आतापर्यंत २४ हजार ९१५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना चाचण्यांचे वाढलेले प्रमाण आणि वेळेवर होणारे निदान त्यासोबतचं प्रभावी उपचार या प्रामुख्याने तीन बाबींमुळे रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसते, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here