भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीतील ‘Umpires Call’ ठरला वादग्रस्त; सचिन तेंडुलकरनं ICCकडे केली ‘ही’ मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या व दुसऱ्या सत्रात DRSचा मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे. ‘Umpires Call’मुळे मॅथ्यू वेड व मार्नस लाबुशेन यांना जीवदान मिळालं. त्यावर महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) नाराजी व्यक्त केली.

या सामन्यातील दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना मॅथ्यू वेड व लाबुशेन यांच्यासाठी टीम इंडियानं DRS घेतला. DRS मध्ये चेंडू यष्टिंवर आदळत असल्याचे दिसत होते, परंतु मैदानावरील पंचांनी त्यांना नाबाद दिल्यानं ‘Umpires Call’ कायम ठेवण्यात आला. त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंसह अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

मास्टर ब्लास्टर संचित तेंडुलकरनेही आपली नाराजी व्यक्त करत म्हटलं कि, ”मैदानावरील पंचांच्या निर्णयावर नाखुश असल्यामुळे खेळाडू DRS घेतात. पण, DRS सिस्टममध्ये ICCनं लक्ष देण्याची गरज आहे. विशेषतः ‘Umpires Call’.” दरम्यान, भारतानं ऑस्ट्रेलियाचे ६ फलंदाज १३३ धावांवर माघारी पाठवले.

तत्पूर्वी ७ बाद २७७ धावांवरून टीम इंडियानं तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू केला. १०० व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर अजिंक्यला माघारी जावं लागलं. अजिंक्य २२३ चेंडूंत १२ चौकारांसह ११२ धावांवर माघारी परतला. अजिंक्यनंतर मिचेल स्टार्कनं जडेजाला बाद केले.

 

जडेजानं ५७ धावा केल्या.  यानंतर टीम इंडियाचे शेपूट गुंडाळण्यात ऑस्ट्रेलियाला फार कष्ट घ्यावे लागले नाही. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क व नॅथन लियॉन यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment