हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यातील शेतकऱ्यांसाठी (Farmers) एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. एशियन-पॅसिफिक इकोनॉमिक कोऑपरेशन क्लायमेट सेंटरने (APEC) दिलेल्या माहितीनुसार यावर्षी भारतामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. त्यामुळे दुष्काळामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आपल्या शेतात पीक फुलवता येणार आहे. तर, अधिक पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याची टंचाई ही जाणवणार नाही. भारतामध्ये यावर्षी अधिक पाऊस पडल्यास पिकांचे उत्पन्न देखील चांगले निघेल.
सध्याच्या घडीला ग्लोबल वॉर्मिंगमुळे जागतिक पातळीवर होणारे बदल पिकांसह इतर अनेक गोष्टींवर देखील विपरीत परिणाम करताना दिसत आहेत. अशातच APEC कडून यावर्षी पडणाऱ्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. APEC ने केलेल्या अभ्यासात आढळले आहे की यावर्षी भारतामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल. यासह APEC ने याची देखील माहिती दिली आहे की एप्रिल ते सप्टेंबर कालावधीत जागतिक स्तरावर कोठे कसा व किती पाऊस पडेल.
APEC च्या याच अभ्यासानुसार, यंदा भारतामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये एप्रिल ते सप्टेंबर महिन्यामध्ये निनाचा मान्सूनवर प्रभाव दिसून येईल. तर मार्च ते मे महिन्यामध्ये अल निनोचा प्रभाव दिसेल. परंतु त्यानंतर जून ते सप्टेंबर महिन्यात निनाच्या स्थितीमुळे पावसावर याचा सकारात्मक परिणाम पडेल. ज्यामुळे भारतातील अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस बसेल. यात हा पाऊस किती प्रमाणात पडेल? यामुळे पिकांचे नुकसान होणार की नाही, हे सांगण्यात आलेले नाही.