श्रीनगर वृत्तसंस्था | भारतीय वायुसेनेच्या हॅलिकॉप्टरला जम्मू- काश्मीरच्या बडगाम येथे अपघात झाला आहे. या अपघात दोन अधिकारी वैमानिक आणि सह वैमानिक शाहिद झाले आहेत. हॅलिकॉप्टरमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे समजते आहे.
सकाळी १० वाजता हे हेलिकॉप्टर मोकळ्या मैदानात कोसळले. या भीषण अपघातामुळे हेलिकॉप्टरने लगेच पेट घेतला. यात दोन मृतदेह हाती आले आहेत. मात्र त्यांच्या ओळखीची माहिती अद्याप देण्यात आली नाही.सूत्रांच्या माहितीनुसार हेलिकॉप्टरने हवेतच पेट घेतला होता.
बुधवारी भारतात वायुदलाच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे.अतिशय तणावाची परिस्थिती असणाऱ्या जम्मू- काश्मीर भागातच हा अपघात झाल्यामुळे घटनास्थळी गोंधळाचं वातावरण पाहायला मिळत आहे. वायुदलाच्या एमआय- १७ Mi-17 या हॅलिकॉप्टरला हा अपघात झाला असून घटनास्थळी सैन्यदल अधिकारी दाखल झाल्याचं कळत आहे. अद्याप अपघाताचे मूळ कारण स्पष्ट झाले नाही.
इतर महत्वाचे –
राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होणार