विराट कोहली इन्स्टाग्रामवर सुद्धा अव्वल!; पंतप्रधान मोदींना सुद्धा टाकले मागे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणला जातो. वयाच्या ३१ व्या वर्षी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या विराट कोहलीच्या फलंदाजीचे चाहते जगभर आहेत. फिटनेस असो की फलंदाजी, विराट कोणत्याही गोष्टीत तडजोड करीत नाही. इतकेच नाही तर सोशल मीडियावरही तो तितकाच सक्रिय असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून विराटचा चाहतावर्ग त्याला फॉलो करत असतो. अनेकदा विराट कोहली सोशल मीडियावर आपली छायाचित्रे पोस्ट करतो. त्याच्या प्रत्येक पोस्टला त्याचे चाहते नेहमीच पसंत करतात. क्रिकेटच्या मैदानावर अनेक विक्रम करणाऱ्या विराटने आता सोशल मीडियाच्या विश्वात असा एक विक्रम नावावर केला आहे. नुकतेच इंस्टाग्रामवर विराटने ५ कोटी फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे हा विक्रम करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. याआधी कुठल्याही भारतीयाला इंस्टाग्रामवर ५ कोटी फॉलोअर्स लाभले नाही आहेत.

विराट कोहलीने पंतप्रधान मोदींना आणि ट्रम्प यांना टाकले मागे
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचे इन्स्टाग्रामवर ५० मिलियन (दशलक्ष) म्हणजेच ५ कोटी फॉलोअर्स आहेत. यापूर्वी या आकड्यापर्यंत कोणत्याही भारतीय पोहोचू शकला नाही आहे. इंस्टाग्रामवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फॉलोअर्सची संख्याही केवळ ३४.५ मिलियन इतकीच आहे. विराट कोहलीने आतापर्यंत इंस्टाग्रामवर ९३० पोस्ट केले असून तो १४८ लोकांना फॉलो करत आहे. त्याचबरोबर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे केवळ १७.५ मिलियन फॉलोअर्स आहेत.

सोशल मीडियावर सुद्धा विराटचे १०० मिलियनपेक्षा जास्त विराट फॉलोअर्स
विराट कोहलीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून ट्विटरवर टायच्या चाहत्यांची संख्याही वेगाने वाढत आहे. ट्विटरवर विराट कोहलीचे ३३.७ मिलियन फॉलोअर्स आहेत. तर ३७ मिलियन लोक फेसबुकवर भारतीय कर्णधाराला फॉलो करतात. फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामसह विराट कोहलीचे एकूण १२० मिलियन म्हणजेच १२ कोटी लोक फॉलो त्याला करतात.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.