नवी दिल्ली । तेल कंपन्या 1 मार्चला स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतींबाबत मोठा निर्णय घेणार आहेत. येत्या एक महिन्यासाठी एलपीजी सिलेंडरची किंमत किती असेल याबाबतचा निर्णय उद्या 1 मार्च रोजी होणार आहे. तेल आणि एलपीजीच्या किंमतींबाबत दर महिन्याच्या 1 तारखेला आढावा बैठक घेतली जाते. या बैठकीनंतरच तेल आणि एलपीजीची किंमत वाढते आणि कमी होते. एलपीजीच्या किंमतीबाबत विशेषत: पेट्रोलियम कंपन्या निर्णय घेतात.
यावेळी युक्रेन आणि रशियाच्या युद्धाचा परिणामही या बैठकीवर दिसून येईल. अशा स्थितीत भारतातील सर्वसामान्य जनतेलाही या युद्धाचा फटका बसणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल-डिझेलसोबतच एलपीजीच्या किंमतीतही मोठी वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
युक्रेन-रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगातील अनेक देशांमध्ये गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चार-पाच दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 101 डॉलरवर गेली आहे. अशा परिस्थितीत भारतात पेट्रोल आणि डिझेलसोबतच एलपीजीच्या किंमतीही वाढू शकतात, असे ऑइल आणि गॅस सेकरत मधील तज्ज्ञांचे मत आहे. याचा परिणाम अनेक क्षेत्रांवर होणार आहे.
LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीवर काय परिणाम होईल?
आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतींनुसार तेल आणि एलपीजीच्या किंमती वाढल्या आणि कमी केल्या जातात. मात्र, फेब्रुवारी महिन्यात 5 राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका पाहता घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती, मात्र आता आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे, याचा परिणाम भारतावर होऊ शकतो. तसेच..
गेल्या वर्षी दिवाळीपूर्वीच एलपीजी गॅसच्या दरात वाढ करण्यात आली होती. एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 266 रुपयांनी मोठी वाढ झाली असली तरी ही वाढ केवळ व्यावसायिक सिलिंडरमध्ये करण्यात आली आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ होत नाहीये.