खळबळजनक!!! भारताच्या कर्णधारासह तीन खेळाडूंना झाली करोनाची बाधा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात एकामागून एक करोनाचे धक्के बसत आहेत. त्यातच आज तर भारताच्या कर्णधारासह तीन अन्य खेळाडूंना करोना झाल्याचे पाहायला मिळाले आहे. भारतीय क्रीडा विश्वासाठी ही धक्कादायक बाब असल्याचे म्हटले जात आहे.

खरं तर खेळाडूंची प्रतिकारशक्ती ही सर्वात चांगली असते, असे म्हटले जाते. पण आता तर चक्क भारताच्या कर्णधारालाच करोना झाल्याचे पाहायला मिळत आहे. या कर्णधाराबरोबरच तीन अन्य खेळाडूंही करोना पॉझिटीव्ह असल्याचे पाहायला मिळाले आहे.

भारताच्या हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग हा करोना पॉझिटीव्ह असल्याचे आता समोर आले आहे. त्याचबरोबर मनप्रीतबरोबर असलेले जसकरण सिंग, वरुण कुमार आणि सुंदर कुमार यांनाही करोनाची बाधा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. हे चौघेही आपल्या घरून बंगळुरु येथील क्रीडा प्राधिकरणामध्ये सरावासाठी आले होते. घरातून बंगळुरुपर्यंतचा प्रवास करत असताना त्यांना करोनाची बाधा झाल्याचे म्हटले जात आहे.