TRP साठी मेकर्सचा नवा डाव; इंडियन आयडॉल १२ चा आणखी एक ड्रामा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एकेकाळी इंडियन आयडॉल हा छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय असा सिंगिंग रिऍलिटी शो होता. मात्र अलीकडे या शोचा टीआरपी इतका ढासळला आहे, कि आता तो पूर्ववत आणण्यासाठी न जाणे किती काळ जाईल. शोच्या टीआरपीसाठी सुरु असलेले एकापेक्षा एक ड्रामे पाहून लोक अत्यंत संतापले आहेत. मात्र तरीही मेकर्सचा नाटकी अंदाज कायम आहे. शोच्या आगामी भागात विशेष पाहुणे म्हणून अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांना बोलावण्यात आले आहे. दरम्यान या सेलिब्रिटींच्या मदतीने स्पर्धक सायली कांबळेच्या पालकांसोबत मेकर्सने असे रंग उधळले आहेत की ज्यामुळे पुन्हा त्यांच्यावर टीकांचा पाऊस पडतो आहे. याचा व्हिडीओ सोनी वाहिनीच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

https://www.instagram.com/tv/CPFvyGRHad1/?utm_source=ig_web_copy_link

सध्या इंडियन आयडॉल चे १२ वे सीजन सुरु असून ते चांगलेच चर्चेत असते. चर्चेपेक्षा जास्त वादात असते. एक वाद संपतो न संपतो तोवर ह्या शोचे मेकर्स नवा वाद ओढवून घेताना दिसतात. सोनी वाहिनीच्या पेजवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये कुमार सानू सायलीच्या आईला विचारतात, हा रोमँटिक भाग सुरू आहे, तर मग तुमचे मिस्टरही रोमँटिक आहेत का नाही? त्यावर सायलीची आई म्हणते, अजिबात नाही. यावर सायली आपल्या वडिलांची बाजू घेत म्हणते, ते खूप रोमँटिक आहेत. पुढे सानू विचारतात, की त्यांनी तुम्हांला कधी डेटवर नेले आहे का नाही? यावर सायलीची आई नाही असे उत्तर देते.

https://www.instagram.com/p/CPKvKM9rdtF/?utm_source=ig_web_copy_link

यामुळे सानू त्यांना सांगतात की, आज इथे तुमच्यासाठी कँडल लाईट डिनर आयोजित केले आहे. तुम्हा दोघांची डेट इथेच आहे. हे दोघे रोमान्स करणार आणि मी यांच्यासाठी गाणे गाणार. मग दोघांसाठी स्टेजवरच एक डिनर डेट आयोजित केली जाते. या व्हिडीओनंतर पुन्हा एकदा शोवर भरभरून टीका झाल्या आहेत. गाणी दाखवायचे सोडून तुम्ही हे काय दाखवताय? असा सवाल प्रेक्षक वारंवार मेकर्सना करत आहेत.

https://www.instagram.com/tv/CPJIMueHBr8/?utm_source=ig_web_copy_link

तसे पाहता इंडियन आयडॉल हा एक रिऍलिटी शो असला तरी यामध्ये दाखवल्या जाणाऱ्या जवळ जवळ सगळ्याच गोष्टी निव्वळ बनावटी आणि खोटारड्या असतात. स्पर्धकांची गरीबी, परिक्षकांचं धाय मोकलून ढसाढसा रडणं, पालकांच्या आर्थिक समस्या एवढ कमीच म्हणून काय तर विशेष पाहुण्यांनी स्पर्धकांची केलेली स्तुती देखील खोटी असते, हे जवळजवळ स्पष्ट झाले आहे.

https://www.instagram.com/tv/CPIS24LHPl9/?utm_source=ig_web_copy_link

या गेस्टना चक्क यासाठी पैसे मिळतात. असे वारंवार याच शोमध्ये भाग घेतलेल्या स्पर्धकांनी माध्यमांना सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर पालकांची सुरु असलेली डेट नाईट पाहून प्रेक्षकांच्या संतापाचा भडकाच उडाला आहे.

Leave a Comment