हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘इंडियन आयडॉल’ १२ सध्या एक नव्हे तर अनेक विविध कारणांमुळे चांगलेच चर्चेत आहे. एकानंतर एक अनेक खोट्या गोष्टींचा पर्दाफाश झाल्याने चाहते या शोबाबत नाराजी व्यक्त करू लागले आहेत. हा सर्व काही बाजार टीआरपीसाठी चालू असल्याचे बोलले जात आहे. इंडियन आयडॉलच्या सुरुवातीला परीक्षक नेहा कक्कर आणि आदित्य नारायण यांच्या लग्नाची तयारी दाखवण्यात आली. इतकेच नव्हे तर या दोघांच्या कुटुंबातील सदस्य एकमेकांना भेटले देखील होते. पण त्यांचे लग्न होऊ शकले नाही. काही दिवसांनी यांनी वेगवेगळ्या लोकांशी लग्न केले. त्यांनी लग्न केलेल्या व्यक्तींसोबत त्यांचे आधीपासूनच कित्येक वर्ष अफेअर होते हे समोर आले. यामुळे हे सगळे काही टीआरपीसाठी करण्यात आल्याचे समोर आले होते.
https://www.instagram.com/p/B1YnufTAcY1/?utm_source=ig_web_copy_link
त्यांनतर काही दिवसांपूर्वी सुप्रसिद्ध गीतकार संतोष आनंद यांनी ‘इंडियन आयडॉल १२’ मध्ये हजेरी लावली होती. यावेळी संतोष आनंद यांना पाहून केवळ ‘इंडियन आयडॉल’च्या सेटवर नव्हे तर त्यांना टीव्हीवर पाहणाऱ्या प्रेक्षकांची मने देखील हळहळली होती. त्यांची अवस्था पाहून सर्व वातावरण भावुक झाले.
https://www.instagram.com/p/CLi_o6AHeoy/?utm_source=ig_web_copy_link
‘इंडियन आयडॉल १२’च्या सेटवर आलेल्या संतोष आनंद यांनी त्यांची सद्यपरिस्थिती आणि मुलगा व सुनेबद्दल सांगितले. त्यांची कर्मकहाणी ऐकून सर्वांचे डोळे पाणावले. यादरम्यान नेहा कक्करने संतोष आनंद यांना ५ लाख रूपयांची मदत देऊ केली. तुमची नात समजून हे पैसे घ्या, असे नेहा त्यांना म्हणाली. पण हा सगळं प्रकार देखील टीआरपीचाच भाग आहे. टीआरपीसाठी मेकर्सने गरिबीची थट्टा केली आहे, असे आरोप नेटकऱ्यांनी केले.
https://www.instagram.com/tv/CLzJAJEJFXX/?utm_source=ig_web_copy_link
इंडियन आयडॉलचा १२ चा स्पर्धक सवाई भट हा खूप गरीब घरातुन असल्याचे दाखवले होते. सवाईच्या घरचे लोक कठपुतली तयार करण्याचे काम करतात. यातून त्यांची फार कमाई होत नाही, असा दावा केला होता. मात्र सवाईचे जे फोटे सोशल मीडियावर व्हायरल झाले. ते पाहून तो इतक्या गरीब घरातला नाहीच हे समोर आले. त्यानंतर सोशल मीडियावर निर्मात्यांना आणि सवाईला खूप ट्रोल केले गेले. तसेच काही दिवसांपूर्वी सवाईने शो सोडून जायचे आहे आणि आईसोबत रहायचे आहे, असे म्हटले होते. तर शोचे परीक्षक हिमेश रेशमिया आणि विशाल दादलानी त्याला समजवतात आणि तो शो सोडून जाण्याचा विचार बदलतो. शोच्या टीआरपीसाठी मेकर्सनी पुन्हा सवाईच्या गरिबीचा वापर केला आणि शोमध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट स्क्रिप्टेड आहे असे म्हटले गेले.
https://twitter.com/ForTheNation247/status/1392360907146072070
तर नुकताच इंडियन आयडॉल १२ मध्ये किशोर कुमार स्पेशल एपिसोड होता. दरम्यान नेहा कक्कर आणि हिमेश रेशमियाने किशोर कुमार यांची गाणी गायली. यामुळे त्या दोघांनाही लोकांनी जबरदस्त ट्रोल केले. इतके कमी की काय म्हणून या एपिसोडमध्ये स्पेशल गेस्ट बनून आलेले किशोर कुमार यांचे पुत्र अमित कुमार यांनीही शोबाबत अश्या गोष्टींची पोलखोल केली, कि सगळं खेळच संपला. शूट सुरु होण्यापूर्वीच मला स्पर्धकांचे कौतुक करायचे आहे, असे सांगण्यात आले आणि मी तेच केले, असे सांगत अमित कुमार यांनी पडद्यामागील सत्य समोर आणले.