Video ऑपरेशन ‘समुद्र सेतू’: भारतीयांच्या घरवापसीसाठी ‘INS जलाश्व’ मालदीवमध्ये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । कोरोना व्हायरसमुळे विविध देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी नौदलाने ‘समुद्र सेतू’ ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेतंर्गत भारतीयांना परत मायदेशी आणण्यासाठी नौदलाची ‘आयएनएस जलाश्व’ ही युद्धनौका मालदीवमध्ये दाखल झाली आहे. मालदीवची राजधानी मालेमध्ये ही युद्धनौका पोहोचली आहे.

आयएनएस जलाश्व बरोबर ‘आयएनएस मगर’ ही युद्धनौका सुद्धा या मोहिमेमध्ये असणार आहे. पहिल्या टप्प्यातील मोहिमेत मालदीवमधून १ हजार भारतीयांना परत आणण्यात येणार आहे. मालदीवमधून भारतात येताना नागरिकांना COVID-19 संबंधित सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करावे लागेल. मायदेशी परतणाऱ्या भारतीयांना प्रवासादरम्यान मूलभूत आणि वैद्यकीय सुविधा देण्यात येतील. ‘COVID-19 शी संबंधित आव्हानांमुळे नागरिकांना कठोर नियमांचे पालन करावे लागेल’ असे नौदलाच्या प्रवक्त्याने सांगितले. मालदीवहून निघाल्यानंतर या युद्धनौका केरळ कोचीमध्ये येतील. सर्व प्रवाशांना तिथेच उतरवण्यात येईल. त्यानंतर संबंधित राज्यांकडे सुपूर्द केले जाईल.

परराष्ट्र, संरक्षण, गृह, आरोग्य आणि अन्य मंत्रालयांशी समन्वय राखून ‘समुद्र सेतू’ मोहीम सुरु असल्याचे नौदलाकडून सांगण्यात आले. भारताने आयएनएस शार्दुल ही युद्धनौका संयुक्त अरब अमिरातीला पाठवली आहे. याशिवाय १२ देशांमध्ये अडकलेल्या १५ हजार भारतीयांना परत आणण्यात येणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment