कोरोना व्हायरसचा भारतीय नौदलावरही परिणाम; ‘मिलान २०२०’ नौदल अभ्यास पुढे ढकलला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता भारतीय नौदलाने विशाखापट्टणममध्ये होणाऱ्या ‘मिलान 2020’ नौदल सराव अभ्यासाला स्थगिती दिली आहे.आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे १८ ते २८ मार्च दरम्यान हा नौदल सर्व अभ्यास होणार होता. “कोरोना व्हायरसचा धोका आणि नौदल अभ्यासात सहभागींच्या सुरक्षिततेचा विचार करता, विशाखापट्टणममध्ये १८ ते २८ मार्च दरम्यान होणार बहुपक्षीय नौदल सराव पुढे ढकलण्यात आला आहे.” अशी माहिती नौदलाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनातून दिली आहे.

जगातील बर्‍याच देशांमध्ये कोरोना व्हायरसच्या दहशतीनंतर आता हळूहळू भारतातही त्याचा प्रसार होत आहे. आतापर्यंत भारतात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या ६ रुग्णांची नोंद झाली आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार जयपूरमध्ये एका इटालियन नागरिकाच्या रक्ताच्या नमुन्यांची तिसरी चाचणीही कोरोना पॉझिटिव्ह आली आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment