Indian Overseas Bank ने FD वरील व्याजदरात केला बदल, नवीन व्याज दर पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Indian Overseas Bank : RBI कडून नुकतेच रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता Indian Overseas Bank ने देखील आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात 35 बेसिस पॉईंट्सपर्यंत वाढ केली आहे.

मात्र ही दर वाढ 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या एफडीसाठीच असेल. 10 ऑक्टोबरपासून हे नवीन दर लागू होतील. Indian Overseas Bank कडून आता 7 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर 3.60% ते 5.85% दराने व्याज दिले जाते आहे. तसेच बँक आता 1000 दिवसांच्या FD वर 6.00% वार्षिक दराने व्याज देईल.

IOB deposit scheme indian overseas bank fd fixed deposit: IOB : திடீர் அறிவிப்பு.. அந்த திட்டத்திற்கு மட்டும் வட்டியை குறைத்தது! - IOB deposit scheme indian overseas bank fd fixed deposit interest ...

नवीन व्याज दर तपासा

Indian Overseas Bank कडून आता 7-14 दिवसांच्या एफडीवरील व्याजदर 3.25% वरून 3.60% आणि 15-29 दिवसांच्या एफडीवरील व्याजदर 3.25% वरून 3.60% पर्यंत वाढवण्यात आला आहे. तसेच आता 30 ते 45 दिवसांच्या FD वर 3.60% आणि 46 ते 90 दिवसांच्या FD वर 3.75% व्याज दिले जाईल. त्याच बरोबर 91-179 दिवसांच्या FD वर 4.10% आणि 180 दिवसांपासून एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर 4.65% व्याज मिळेल.

IDFC can now exit as promoter of IDFC First Bank - BusinessToday

Indian Overseas Bank कडून एका वर्षापासून ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वरील व्याजदर 5.60% वरून 5.70% केला गेला आहे. त्याच वेळी, बँकेने आता 444 दिवसांच्या FD वर 5.65% ऐवजी 5.85% व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. आता ग्राहकांना 2 वर्षापासून 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या (1000 दिवस सोडून) FD वर 5.70% व्याज मिळेल. तसेच 1000 दिवसांच्या FD वर 6.00% व्याज मिळेल. तसेच 3 वर्ष आणि त्याहून जास्त कालावधीच्या FD वर फक्त 5.85% दराने व्याज मिळेल.

Fixed Deposit Interest Rate, Fixed Deposit Calculator, FD Calculator, FD Interest Rate, FD Interest Rate 2021 | Personal News – India TV

अनेक बँकांनी मुदत ठेवींचे दर वाढवले ​​आहेत

अलीकडेच CSB बँक लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक, RBL बँक, Axis बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Fear of lending, few borrowers — why banks are flooding RBI with funds for low returns

रेपो रेट गेल्या 3 वर्षांच्या उच्चांकावर

अलीकडेच, RBI ने आपल्या द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्क्यांवर नेला. हा त्याचा 3 वर्षाचा उच्चांक आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. Indian Overseas Bank

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.iob.in/Domestic_Rates

हे पण वाचा :
Multibagger Stock : गेल्या काही वर्षांत 200% जास्त रिटर्न देऊन ‘या’ शेअर्सने गुंतवणूदारांना केले मालामाल !!!
Canara Bank ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार 7.5% व्याज
Bank FD : ‘या’ 102 वर्ष जुन्या बँकेकडून FD वरील व्याजदरात वाढ, नवीन व्याज दर तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ, नवीन दर पहा
Whatsapp Banking : घरबसल्या आपल्या बँकेशी संबंधित सर्व माहिती मिळवण्यासाठी ‘Save’ करा ‘हे’ नंबर