Good News! ‘टीम इंडिया’च्या ‘या’ धुरंधर खेळाडूला कन्यारत्न प्राप्ती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून नुकतंच दुसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखाली भारताने ऑस्ट्रेलिया संघावर दमदार विजय मिळवला. त्यातच भारतीय संघाच्या चाहत्यांसाठी अजून एक आनंदाची बातमी आहे. भारतीय संघाचा स्टार जलदगती गोलंदाज उमेश यादवला कन्यारत्न प्राप्त झाले आहे.

फेसबुक आणि ट्विटरवर एक छानसा फोटो पोस्ट करत त्याने ही आनंदाची बातमी साऱ्यांना सांगितली. “मुलगी झाली”, असं कॅप्शन देत त्याने फोटो पोस्ट केला आहे. “माझी चिमुकली राजकुमारी, या जगात तुझं स्वागत आहे. तुझ्या येण्याने मी खूपच आनंदी झालो आहे”, असा मजकूर फोटोवर लिहिण्यात आला आहे.

उमेश यादव देखील सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून नुकतच त्याच्या पायाला दुखापत झाली असून तो मागील सामन्यात मैदानाबाहेर जाताना दिसला होता. त्यामुळे उमेश यादव आगामी सामन्यात खेळेल की नाही याबाबद्दल जरा शंका आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’