Indian Post Recruitment 2025| सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवक (GDS) भरतीसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. याअंतर्गत एकूण 25,200 पदांची भरती केली जाणार आहे. महत्वाचे म्हणजे, या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. कारण, उमेदवारांची निवडही मेरिटच्या आधारावर केली जाईल.
या भरतीसाठी 3 मार्च 2025 पासून अधिकृत संकेतस्थळ indiapostgdsonline.gov.in येथे ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 28 मार्च 2025 निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे, इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
या भरतीसाठी उमेदवारांचे वय 18 ते 40 वर्षांदरम्यान असावे. अनुसूचित जाती-जमाती (SC/ST) उमेदवारांना 5 वर्षे, ओबीसी उमेदवारांना 3 वर्षे आणि दिव्यांग उमेदवारांना 10 वर्षांची वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे.
अर्ज शुल्क
या भरती प्रक्रियेत सामान्य, ओबीसी आणि आर्थिक दुर्बल घटक (EWS) उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 100 रुपये निश्चित करण्यात आले आहे. मात्र, अनुसूचित जाती/जमाती (SC/ST), महिलांसाठी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी अर्ज मोफत राहील.
वेतन
निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला 10,000 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे. याशिवाय अतिरिक्त भत्तेही मिळतील. दरम्यान, या भरतीबाबतच्या ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी इच्छुकांनी संबंधित अधिकृत प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवावे. तसेच वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.




