हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वे (Indian Railways)आपल्या प्रवाश्यांसाठी नेहमी काही ना काही निर्णय घेत असते. मागच्या काही दिवसांपासून भारतीय रेल्वेत वेटिंग लिस्टवर असलेले तिकीट कन्फर्म होणार याची चर्चा सुरु होती. त्यातच आता RAC प्रवाश्यांसाठी भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी असल्यामुळे प्रत्येकाला याचे तिकीट मिळते असे नाही. त्यामुळे रेल्वेने या सर्व गोष्टीचा विचार करत एक निर्णय घेतला आहे. आता निर्णय नेमका काय आहे? ते जाणून घेऊयात.
काय घेतला निर्णय?
रेल्वेने (Indian Railways) प्रवास अनेकजण करतात. त्यामुळे काहीजण वेटिंगमध्ये नोंदणी करतात ते कोणाचे तरी तिकीट रद्द होऊन त्याजागी आपल्याला सीट मिळेल. परंतु कधी कधी असे न होता प्रवाश्यांना जागा देण्यासाठी RAC तरी मिळते. परंतु त्यातही त्यातही अनेक कारणावरून प्रवाश्यांमध्ये छोटया मोठ्या कारणावरून कुरबुरी होत असतात. त्यामुळे रेल्वे बोर्डाने सर्व विभागीय रेल्वे आणि आयआरसीटीसीच्या सीएमडीला पत्र पाठवण्यात आले आहे. त्यामध्ये RAC च्या प्रवाश्यांना वेगळे बेडरोल देण्यात यावे असे सांगण्यात आले आहे. यामध्ये ब्लँकेट, बेडशीट आणि टॉवेल, उशीसह संपूर्ण बेड रोल किट देण्यात येणार आहे. त्यामुळे कायमची झंझट मिटेल ही अशा व्यक्त केली जात आहे.
प्रवाश्यांचा प्रवास सोयीचा होईल याची रेल्वे घेते काळजी- Indian Railways
एसी क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या बर्थच्या बाजूला ही RAC ची सीट असते. ही सीट तुम्हाला तेव्हाच मिळते जेव्हा तुम्ही वेटिंग लिस्टवर असता. त्यामध्ये जर एखादी जागा रिकामी असेल तरच तुम्हाला ती जागा मिळते. मात्र असे झाले नाही तर (Indian Railways) रेल्वे दोन्ही प्रवाश्यांचा प्रवास हा सोयीचा होईल याची काळजी घेते.
का घेण्यात आला निर्णय?
RAC प्रवाश्यांना दिल्या जाणाऱ्या तिकिटात बेडरोलचे भाडे वसुल केले जाते. त्यामुळे समान भाडे दिले गेल्यामुळे या प्रवाश्यांची गैरसोय होऊ नये म्हणून लिनन आणि संपूर्ण बेडरोल किटची व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे प्रवाश्यांना याचा फायदा नक्कीच होईल.