१५ एप्रिलनंतर ट्रेन सुरु करण्याबाबत रेल्वे मंत्रालय म्हणतं..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाउन लागू करण्यात आला. या दरम्यान, कोरोनाचा संसर्गाचा धोका लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयानंही लॉकडाउन संपेपर्यंत प्रवासी रेल्वे न चालवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १५ एप्रिलला लॉकडाऊन संपणार आहे. त्यामुळं रेल्वे पुन्हा आपली सेवा पूर्ववत सुरु करणार का? असा सवाल देशातील अनेक भागात वेगवेगळ्या राज्यातील अडकलेल्या अनेक लोकांच्या मनात आहे. त्यावर रेल्वे मंत्रालयानं स्पष्टीकरण दिलं आहे.

प्रवासी रेल्वे सेवा १५ एप्रिलनंतर पुन्हा सुरु करण्यासदंर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. लॉकडाउन पूर्ण झाल्यानंतर प्रवासासाठी आतापर्यंत कोणताही प्रोटोकॉल जारी करण्यात आला नाही. यासंदर्भात कोणताही निर्णय झाल्यास तो सर्वांना सांगितला जाईल, असंही मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं. रेल्वेच्या या स्पष्टीकरणानंतर प्रवासी रेल्वे सेवा अजून काही काळ बंदच राहणार हे स्पष्ट झालं आहे. दरम्यान, याकाळात जीवनावश्यक वस्तूंची ने-आण करण्यासाठी मालवाहक ट्रेन अजूनही सुरु आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

या बातम्याही वाचा –

adf

Leave a Comment