Indian Railway : भारतीय रेल्वेचा दळणवळणामध्ये मोठा वाटा आहे. केवळ प्रवासी वाहतूक नाही तर रेल्वे मालवाहतुकीतही मोठा वाटा उचलते. केवळ देशांतर्गत नाही तर परदेशातील मालाची देवाणघेवाण करण्यासाठी देखील रेल्वे महत्वाची आहे. प्रवासी वाहतुकीसोबतच मालवाहतुकीसाठी देखील रेल्वेला चांगला महसूल प्राप्त होतो. मिळालेल्या माहितीनुसार 2023-24 या वर्षात मालवाहतुकीतून रेल्वेला (Indian Railway) तब्बल 2.4 लाख कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.
या वर्षात आतापर्यंत 150 कोटी टनांहून अधिक मालाची वाहतूक रेल्वेकडून करण्यात आली. आणि त्यातून रेल्वेने 2.4 लाख कोटी रुपयांचा विक्रमी महसूल मिळवला आहे. 15 मार्चपर्यंत 17 हजार कोटी रुपयांची अधिक (Indian Railway) कमाई केली आहे. या तुलनेत गेल्या वर्षी याच कालावधीत 2.23 लाख कोटी रुपयांची कमाई झाली होती. अशी माहिती रेल्वेने दिली आहे.
रेल्वेने 2.26 लाख कोटी रुपये खर्च केले (Indian Railway)
रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 2023-24 या आर्थिक वर्षात रेल्वेचा एकूण खर्च 2.26 लाख कोटी रुपये होता. 2023-24 या आर्थिक वर्षात भारतीय रेल्वेने मालवाहतूक व्यवसाय, एकूण महसूल, ट्रॅक टाकणे या बाबतीत आपले पूर्वीचे सर्व रेकॉर्ड मोडले.
प्रवाशांच्या संख्येतही वाढ (Indian Railway)
रेल्वे मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार 2023-24 या आर्थिक वर्षात 648 कोटी प्रवाशांनी (Indian Railway) रेल्वेने प्रवास केला, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत 52 कोटी अधिक आहे. गेल्या वर्षी 596 प्रवाशांनी रेल्वेने प्रवास केला होता. यापूर्वी 2022-23 या आर्थिक वर्षात विक्रमी 151.2 कोटी टन मालाची वाहतूक झाली होती.