Anand Mahindra : आमच्यासाठी काहीच सुविधा का नाही? चिमुकल्याच्या ट्विटवर महिंद्रांची प्रतिक्रिया; म्हणाले, लवकरच…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Anand Mahindra) आजच्या डिजिटल युगातील लहान मुलं मोठ्यांपेक्षाही जास्त आधुनिक गोष्टींचा वापर करताना दिसतात. त्यामुळे अनेक लहान मुले सोशल मीडिया युजर्स आहेत. या माध्यमातून ही मुलं आपल्या कल्पना आणि शोध घेण्याच्या क्षमतेला विकसित करत असतात. तसेच आपल्याला पडलेले प्रश्न अगदी निरागसपणे ही मुलं वेगवेगळ्या माध्यमातून विचारतात. असाच एका लहान मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यामध्ये त्याने महिंद्राच्या शोरूममध्ये मुलांसाठी काहीच सुविधा का नाही? असा प्रश्न विचारला आहे. यावर स्वतः आनंद महिंद्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे

महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. (Anand Mahindra) ते आपल्या हँडलवरून अनेकदा वेगवेगळ्या पोस्ट देखील शेअर करताना दिसतात. यामुळे आनंद महिंद्रा यांचे सोशल मीडियावर अनेक फॉलोवर्स आहेत. या हँडलच्या माध्यमातून ते आपल्या फॉलोवर्सच्या प्रश्नांची उत्तरे देखील देतात. यावेळी त्यांनी एका चिमुकल्याच्या ट्विटला उत्तर दिले आहे.

चिमुकल्याचा व्हायरल व्हिडिओ

काही दिवसांपूर्वी एका लहान मुलाने आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांना टॅग करत एक पोस्ट केली होती. विकास गर्ग नावाच्या युजरने या मुलाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये हा लहान मुलगा आपल्या पालकांसह महिंद्रा शोरूममध्ये कार घेण्यासाठी गेला होता. मात्र, या शोरूममध्ये मोठ्यांसाठी चहा, पाणी सर्व सुविधा आहेत. पण मुलांसाठी काहीच का नाही? असा सवाल त्याने केला.

हा व्हिडिओ शेअर करताना सोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘कार खरेदीचे निर्णय यात कुटुंबातील लहान मुलांच्या मताला फार महत्त्व असते. त्यामुळे आनंद महिंद्रा सर, महिंद्रा शोरूममध्ये लहान मुलांसाठी ही सुविधा असायला हव्यात असे मास्टर अद्विकचे आवाहन आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर (Anand Mahindra) आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ रिट्विट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले आनंद महिंद्रा? (Anand Mahindra)

मास्टर अद्विकच्या ट्रीटला उत्तर देताना आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘विकासजी तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. कार खरेदी करण्याच्या निर्णयांमध्ये कुटुंबातील लहान मुलांच्या मताचा आणि विचारांचा मोठा प्रभाव पडतो. आम्ही आतापर्यंत महिंद्रा शोरूममध्ये मुलांसाठी कोणतीही विशेष व्यवस्था केली नव्हती. परंतु आमची टीम मास्टर अद्विकच्या सूचनेनुसार लवकरच काही विशेष व्यवस्था करेल’.