हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वे (Indian Railways) पुढील काही महिन्यांत सर्व रेल्वे मार्गांचे 100 टक्के विद्युतीकरण करणार असून त्यादृष्टीने ठोस पाऊले टाकली जात आहेत अशी माहिती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दिली आहे. येत्या डिसेंबर महिन्याअखेर म्हणजेच पुढील काही महिन्यात भारतीय रेल्वे इलेक्ट्रिक ऊर्जेवर चालवली जाईल. तेलंगणातील निजामाबाद येथे 8,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी कार्यक्रमानंतर ते बोलत होते .
डिसेंबर अखेरपर्यंत होणार काम पूर्ण- Indian Railways
भारतीय रेल्वेच्या नुसार, 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 14 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विद्युतीकरण पूर्णपणे पूर्ण झाले आहे. याव्यतिरिक्त, ६ राज्यांमध्ये 90% पेक्षा जास्त आणि इतर पाच प्रदेशांमध्ये सुमारे 75% विद्युतीकरण झाले आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये मात्र यात उशीर दिसून येतो आहे. परंतु तिथे लवकरच काम पुर्ण होऊन डिसेंबर अखेर 100 % चे उदिष्ट पुर्ण केले जाईल.
थर्मल पॉवर प्लांटचे पहिले युनिट देशाला समर्पित
पंतप्रधान नरेंद्र मोदी तेलंगणा राज्यातील 8000 करोड रुपये किंमतीच्या विकासकामांचे उदघाटन करण्यात आले. तेलंगणा राज्यात पंतप्रधानांनी मनोहराबाद आणि सिद्धीपेट यांना जोडणाऱ्या नवीन मार्गासह आणि धर्माबाद-मनोहराबाद आणि महबूबनगर-कुरनूल दरम्यानच्या विद्युतीकरण रेल्वे प्रकल्प देशाला समर्पित केला. त्याच बरोबर तेलंगणा राज्यातील पेड्डापल्ली जिल्ह्यातील एनटीपीसीचा सुपर थर्मल पॉवर प्लांटचे पहिले युनिट राष्ट्राला समर्पित करण्यात आले. ज्याची 800 MW एवढी क्षमता आहे.