Indian Railways : महाराष्ट्रातील ‘या’ रेल्वे स्टेशनवर मिळतंय फक्त 20 रुपयांत जेवण; तुम्हीही घ्या लाभ

Indian Railways Food
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वेने (Indian Railways) प्रवास करणे प्रत्येकाला आवडतं. रेल्वेने आपण आरामदायी आणि निवांत प्रवासाचा आनंद घेत आपला प्रवास एन्जॉय करतो. पण तुम्हाला माहिती आहे का? भारतीय रेल्वेच्या माध्यमातून प्रवाशांना वेगवेगळ्या सुविधा दिल्या जातात. या सुविधांपैकी एक असलेली सुविधा म्हणजे जेवण. आता महाराष्ट्रातील औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना कमी किमतीमध्ये जेवणाचे पॅकेट उपलब्ध करण्यात येणार आहे. हे जेवणाचे पॅकेट खास करून जनरल डब्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.

20 रुपयांत मिळतंय जेवण – (Indian Railways)

रेल्वे स्टेशनवर IRCTC च्या मदतीने रेल्वे प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर जनरल डब्याजवळ स्टॉल उभारण्यात येतील. आणि या स्टॉलमध्ये खाण्याचे पदार्थांची पॉकिट विकले जातील. रेल्वे प्रवाशांना खाद्यपदार्थांसाठी इकडेतिकडे भटकावे लागू नये, आणि प्रवाशांना दर्जेदार आणि कमी किमतीत आरोग्यदायी जेवण मिळावं यासाठी भारतीय रेल्वेने (Indian Railways) इकॉनोमी मिल ही कन्सेप्ट सुरू केली आहे. भारतीय रेल्वे सुरू केलेल्या इकॉनोमिक मिल या कन्सेप्टनुसार रेल्वे प्रवाशांना खास करून जनरल डब्यांसाठी परवडणाऱ्या किमतीमध्ये जेवण उपलब्ध करून देण्यात येईल. या इकॉनॉमिक मिल ची किंमत 20 रुपये एवढी असेल. आणि कॉम्बो मिलची किंमत 50 रुपये ठेवण्यात आली आहे.

रेल्वे स्टेशनवर जन आहार किचन युनिटच्या माध्यमातून IRCTC रिफ्रेशमेंट रूम्स आणि विस्तारित सेवा काउंटर च्या माध्यमातून ही खाद्यपदार्थांची पाकिटे दिले जातील. हे सर्विस काउंटर प्लॅटफॉर्म जनरल कोच च्या डब्यांजवळ लावण्यात येत आहे. जेणेकरून मोठ्या संख्येने प्रवाशांना या सेवेचा लाभ होईल. या सेवा काउंटरवर फक्त अधिकृत विक्रेतेच प्रवाशांना स्वस्त दरामध्ये खाद्यपदार्थ देतील.