Indian Railways : लोणंद – पुणे रेल्वे प्रवास अवघ्या 2 तासात; तिकीट फक्त 50 रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | लांब पल्ल्याचा आणि सर्वात स्वस्त प्रवास करायचा म्हंटलं कि प्रथम रेल्वेला (Indian Railways) पसंती दिली जाते. मात्र, रेल्वे क्रॉसिंगमुळे वेळ लागत असल्याने तो वाचवण्यासाठी बऱ्याचदा अनेकजण एसटीचा पर्याय निवडतात. मात्र, आता पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे. कारण पुणे ते सातारा रेल्वेचे दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम शिंदवणे ते आंबळे वगळता पूर्ण झाले आहे. त्यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्या पूर्वीप्रमाणे क्रॉसिंगसाठी न थांबता सुसाट वेगाने धावू लागल्या आहेत. त्यामुळे लोणंद ते पुणे रेल्वे प्रवास आता अवघ्या दोन तासांवर आला आहे. आपण फक्त दोन ते अडीच तासांत लोणंद – पुणे प्रवास करू शकणार असून रटासाठी फक्त ५० रुपया लागणार आहे. तर मासिक पास फक्त ३५५ रुपयांत उपलब्ध आहे.

लोणंद – पुणे रेल्वे ‘या’ वेळेत धावणार : Indian Railways

सध्या सातारा जिल्ह्यातील लोणंदहून पुण्याला जाण्यासाठी सकाळी ७.३०, १०.४० कोल्हापूर डेमू एक्स्प्रेस, सव्वाएक वाजता कोयना एक्स्प्रेस, दर मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजता मिरज-पुणे, तसेच रविवार वगळता सायंकाळी ७.२० वाजता फलटण-पुणे एक्स्प्रेस डेमू, सायंकाळी ७.४५ ला महाराष्ट्र एक्स्प्रेस, तर पुण्याहून येण्यासाठी पहाटे ४.२० ला महाराष्ट्र एक्स्प्रेस, रविवार वगळता ६.१० ला पुणे- फलटण डेमू एक्स्प्रेस, सकाळी १०.४० ला पुणे कोल्हापूर, १२.४० ला कोयना एक्स्प्रेस, ६.३० ला पुणे -सातारा डेमू, दर मंगळवारी सकाळी आठ वाजता पुणे-मिरज एक्स्प्रेस, तर ता. ५ नोव्हेंबरपासून सुरू होणारी विशेष ट्रेन (पूर्वीची सह्याद्री एक्स्प्रेस) पहाटे ५ वाजता लोणंदहून सुटणार आहे. तसेच पुण्यातून रात्री ९.४५ वाजता सुटणार आहे.

फक्त 50 रुपये तिकिट

रेल्वेगाड्या प्रवाशांच्या सोयीसाठी उपलब्ध आहेत. आता पूर्वीच्या पॅसेंजरप्रमाणे पुण्याला जाण्यास व येण्यास वेळ लागत नसून सर्व गाड्या वेळेवर व पूर्वीपेक्षा कमी वेळेत पोचत आहेत. फक्त 50 रुपये तिकिटावर कोणत्याही (Indian Railways) रेल्वेगाडीने जलद, सुखकर व सुरक्षित प्रवास (Indian Railways) रेल्वेने करता येणे शक्य झाले आहे. डेमू गाड्यांमध्ये भरपूर जागा उपलब्ध असल्याने प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही लोणंद प्रवासी संघटनेकडून करण्यात आले आहे.