हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ट्रेन्स भारतातील (Indian Railways) प्रवासाचा अविभाज्य भाग आहेत. खिशाला परवडण्यापासून ते देशभरात मोठ्या प्रमाणात पोहोचण्यापर्यंत – असंख्य कारणांमुळे भारतीय रेल्वे ही अनेकांची पहिली पसंती राहिली आहे. पण रेल्वेच्या प्रवासात तुम्हाला हवी ती जागा मिळणे जरा मुश्किलच त्यामध्ये प्रामुख्याने वडिलधाऱ्या, अपंग व गर्भावती स्त्रियांची मोठी अडचण होते. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी व आपल्या प्रवाशांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी रेल्वेने वडिलधाऱ्या, अपंग व गर्भावती स्त्रियांसाठी नवीन घोषणा केली आहे.
ज्येष्ठ नागरिक, अपंग व गर्भवती स्त्रियांसाठी रेल्वेत राखीव जागा- (Indian Railways)
रेल्वेने वडिलधाऱ्या, अपंग व गर्भावती स्त्रियांसाठी प्रत्येक स्लीपर क्लास बोगीत मध्ये lower berth राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून त्यांना प्रवासात कुठलीही अडचण निर्माण होणार नाही तसेच त्यांचा प्रवास अधिक सुखकर होऊ शकेल .यामध्ये प्रामुख्याने रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार, स्लीपर क्लासमध्ये अपंगांसाठी ४ जागा, २ खालच्या, २ मध्यम, थर्ड एसीमध्ये २ आणि एसी 3 इकॉनॉमीमध्ये २ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तसेच गरीब रथ ट्रेनमध्ये, 2 खालच्या जागा आणि 2 वरच्या जागा दिव्यांगांसाठी राखीव आहेत.मात्र त्यांना या जागांसाठी पूर्ण भाडे द्यावे लागणार आहे.
कुठल्याही विशेष नोंदणीची करण्याची गरज नसेल
रेल्वेने (Indian Railways) केलेल्या नियमानुसार , वडिलधाऱ्या, अपंग व गर्भावती स्त्रियांसाठी कुठलीही खास जागेसाठी खास नोंदणी करण्याची गरज नसेल . रेल्वे तिकीट बुक केल्यानंतर रेल्वे स्वतःहून तुमच्या प्रोफाइल नुसार तुम्हाला योग्य ठरेल अशी जागा तुम्हाला मिळवून देईल आणि त्यासाठीच खास जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
अधिकचे पैसे नाही मोजावे लागणार
तुम्ही जर 45 वर्ष्यापेक्षा अधिक वयाच्या महिला असाल तर तुम्हाला खालची ( lower berth ) ची जागा दिली जाईल. तसेच तुम्ही गर्भवती महिला असाल तर तुमचा विचार रेल्वेच्या माध्यमातून केला जाईल. यासाठी तुम्हाला कुठलीही खास नोंदणी किंवा अधिकचे पैसे मोजण्याची गरज नसेल.