हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आपण सर्वजण नेहमी रेल्वेचा (Indian Railways) वापर करतो. जर लांबचा पल्ला गाठायचा असेल तर रेल्वेचे रिजरव्हेशन करून आपण सीट बुक करतो. परंतु असे जरी असलं तरी काही वेळेला रिजरव्हेशन केल्यानंतर वेटींगची सीट भेटते. त्यामुळे असा प्रश्न पडतो की रेल्वेच्या सीट बुक होतात तरी कश्या? त्यात पहिली सीट भेटते तरी कोणाला? या प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेऊयात.
किती असतात रेल्वेच्या सीट? Indian Railways
रेल्वेचे तिकीट बुक करताना पहिले जाते की, एकूण किती सीट आहेत. त्यानुसार त्याची बुकिंग सुरु होते. त्यामुळे कोणत्याही ट्रेनमधील (Indian Railways) एकूण सीटची संख्या ही त्यातील कोचच्या स्थितीवर अवलंबून असते. तसेच रेल्वेमधील सीटची संख्या ही रेल्वेच्या डब्ब्यावरून ठरवली जाते. ज्यात एका डब्यात 72 ते 110 जागा असतात. त्यानुसार तिकीट बुकिंगसाठी जागा रिजर्व्ह केली जाते.
पहिले तिकीट बुक करणाऱ्या व्यक्तीस दिली जाते मधल्या डब्यात जागा
रेल्वेचे तिकीट बुक करण्यासाठी अनेकजण फार आधीपासून तिकीट बुक करतात. तर काही जण एनवेळेवर तिकीट बुक करतात. त्यामुळे रेल्वेने तिकीट बुकिंगचे सॉफ्टवेअर हे एका खास पद्धतीने तयार केले आहे. ज्यामध्ये नियमानुसार जागा बुक केल्या जातात. त्यामुळे जो पहिले तिकीट बुक करतो त्या व्यक्तीसाठी मधल्या डब्यात जागा रिजर्व्ह केली जाते.
100 जागा सॉफ्टवेअरद्वारे केल्या जातात बुक
रेल्वेने (Indian Railways) ज्या नियमानुसार सॉफ्टवेअर तयार केले आहे त्यानुसार पहिल्या 100 जागा या सॉफ्टवेअरद्वारे बुक केल्या जातात. आणि त्यानंतर सीटचे बुकिंग हे डब्याच्या शेवटी म्हणजेच गेटजवळ केले जाते. त्यामुळे या जागा सर्व बुक झाल्यानंतर जो व्यक्ती एनवेळी तिकीट बुक करतो त्यास वेटिंगवर ठेवले जाते. जेणेकरून एखाद्या कन्फर्म तिकीट केलेल्या प्रवश्याचे तिकीट कॅन्सल झाल्यावर वेटिंगवर असलेल्या तिकीटास जागा मिळते. अश्या पद्धतीने तिकीट बुकिंगची प्रक्रिया असते.