Indian Railways Ticket : ‘या’ प्रवाशांना रेल्वे तिकिटावर मिळतेय 100 % सूट

Indian Railways Ticket Discount
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वे हा भारतीयांचा प्रवासाचा सर्वात महत्वाचा स्रोत आहे. देशातील सर्वसामान्य लोकांच्या खिशाला परवडेल अश्या दरात नागरिकांना तिकीट दिली जाते. परंतु तुम्हाला माहितीये का की भारतीय रेल्वे अपंग लोकांना तिकिटावर 100 टक्क्यांची सूट (Indian Railways Ticket) देते. तसेच भारतीय रेल्वे रूग्ण आणि दिव्यांग लोकांनाही तिकीट दरात सूट देते. यामध्ये कोणा – कोणाचा समावेश होतो. याबद्दल जाणून घेऊयात.

भारतीय रेल्वे या अपंग लोकांना देते सवलत- Indian Railways Ticket

१) मानसिकरित्या कमजोर

मनाने दुबळ्या असलेल्या लोकांसाठी रेल्वे तिकिटात सूट देते. यामध्ये 1A/2A/3A/SL/CC क्लाससाठी 75% ची सूट असते. यामध्ये रुग्णासह त्याच्या साथीदारासही ही सवलत मिळते. तर 1A/2A/MST मध्ये 50% ची सूट मिळते.

२) दृष्टीहीन

दृष्टीहीन लोकांना रेल्वे 1A/2A/3A/SL/CC क्लाससाठी 75% ची तर 1A/2A/MST मध्ये 50 % ची सवलत मिळते.

३) डेफ-म्यू

या लोकांना 1A/2A/SL/MST/QST 50 % सवलत मिळते. तर  राजधानी आणि शताब्दीसारख्या ट्रेनसाठीही 3A/CC  तिकिटावर 25% ची सवलत मिळते.

४) कँसर

कॅन्सर असलेल्या व्यक्तीस त्याच्या उपचारासाठी जर एका ठिकानाहून दुसऱ्या ठिकाणी जात असेल तर त्याच्या तकिटावर रेल्वे 100% ची सूट देते. एवढेच नाही तर त्या रुग्णासोबत असलेल्या व्यक्तीलाही तिकिटावर सूट मिळते. यात SL/3A क्लास मध्ये 100% ची सूट असते. तर 2A/कसा च्या तिकिटावर 75% ची सूट असते.  तसेच 1A/2A च्या तिकिटावर 50% ची सूट असते.

५) किडनी पेशंट /डायलेसिस

जो रुग्ण किडनी पेशंट आहे किंवा त्यास डायलेसिस सुरु आहे. असा पेशंट रेल्वेतून प्रवास करत असेल तर त्यास 1A/2A/3A/SL/CC क्लास मध्ये त्याच्या साथीदारासह 75% ची सवलत मिळते. तर 1A/2A मध्ये 50%  ची मिळते.

६) एनीमिया

यात 2A/3A/SL/CC क्लाससाठी रुग्ण व त्याच्या साथीदारास 50% ची सूट मिळते. त्यामुळे सामान्य रुग्णास याचा दिलासा मिळतो.

७) TB

TB असणाऱ्या रुग्णास 1A/2A/SL क्लाससाठी 75% ची सूट मिळते.

८) हीमोफिलिया

हीमोफिलिया असलेल्या रुग्णास 1A/2A/3A/SL/CC क्लासच्या तिकिटासाठी रेल्वे 75 % ची सवलत देते.    कुष्ठ रोगी कुष्ठ रोगी असणाऱ्या रुग्णास ज्याला इन्फेकशन झाले नाही अश्या रुग्णास 1A/2A/SL क्लाससाठी 75% ची सूट मिळते. यामध्ये रुग्णासॊबत असलेल्या व्यक्ततिलाही ही सवलत असते.

कुठून घ्यावे लागेल तिकीट?

जर रुग्णास 300 किलोमीटरपेक्षा अधिक लांबच्या ठिकाणी प्रवास करत असेल तर त्यास ही सवलत लागू होते. या सवलतीचे तिकीट घेण्यासाठी तुम्हाला रिजर्वेशन काउंटरवर जाऊन तिकीट (Indian Railways Ticket) घ्यावे लागेल. यासाठी आजारी व्यक्तीस त्याचे मेडिकल सर्टिफिकेट आणि अपंग व्यक्तीस डिसेबिलिटी सर्टिफिकेट देणे गरजेचे आहे. तरच या तिकिटावर सवलत मिळेल. या स्वरूपाच्या सवलतीमुळे रुग्ण आणि अपंग व्यक्तीला दिलासा मिळतो. तुम्ही ही माहिती इतरांशीही शेअर करू शकता.