Indian Railways Ticket : आता रेल्वे तिकिटासाठी पाहावी लागणार नाही वाट ; सर्वांचे तिकीट होणार कन्फर्म

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वे आपल्या प्रवश्यांसाठी नेहमी काही ना काही फायद्याचा निर्णय घेत असते. सध्या सणासुदीचे दिवस सुरु असल्यामुळे अनेकांना रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळत नव्हते. त्यांना वेटिंग तकिटावर प्रवास करावा लागत होता. त्यामुळे बऱ्याचजणांनी याबाबत तक्रार केली असून यावर लक्ष घालत भारतीय रेल्वेने सर्व प्रवाश्यांना कन्फर्म तकीट (Indian Railways Ticket) देण्याचा निर्णय घेतला आहे.

2027 पर्यंत होणार कन्फर्म तिकीट- Indian Railways Ticket 

दरवर्षी रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या कोटीं मध्ये असते. सध्या ही संख्या 800 कोटी एवढी आहे. त्यासाठी रेल्वेकडून तब्ब्ल 10748 गाड्या सोडल्या जातात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढ्या 800 कोटी लोकांना कन्फर्म तिकीट मिळत असेल का? तर नाही. 800 कोटी प्रवाश्यापैकी प्रत्येकाला कन्फर्म तिकीट मिळत नाही. त्यामुळे प्रवाश्यांची गैरसोय होते. यावर आता भारतीय रेल्वेने तोडगा काढत 2027 पर्यंत सर्व प्रवाश्यांना कन्फर्म तिकीट देण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे याचा फायदा प्रवाश्यांना होणार आहे.

भारतीय रेल्वेची क्षमता वाढवण्याच्या दिशेने काम सुरु – अश्विनी वैष्णव

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवश्यास कन्फर्म तिकीट देण्यासाठी रेल्वेची क्षमता वाढवण्याच्या दिशेने काम सुरु आहे. त्यासाठी रेल्वे ट्रॅक आणि गाड्यांची संख्या वाढवली जाईल. प्रत्येकाला सोयीस्कर प्रवास उपलब्ध करून देणे हाच रेल्वेचा उद्देश आहे. असेही त्यांनी सांगितले.

3000 हजार अतिरिक्त गाड्या सोडल्या जाणार

वर्षीला प्रवास करणाऱ्यांची ही 800 कोटी एवढी असून ती संख्या 1000 कोटी पर्यंत करण्याची तयारी भारतीय रेल्वेकडून केली जात आहे. त्यासाठी रेल्वेकडून तब्ब्ल 3000 हजार गाड्या ज्यादाच्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

18.2 कोटी प्रवश्यांनी केला एसी क्लासमधून प्रवास

मागच्या सात महिन्यात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या ही तब्ब्ल 390.20 कोटी एवढी होती. त्यामध्ये नॉन एसी वाले 372 कोटी तर एसी वाले 18.2 कोटी प्रवाश्यांनी प्रवास केला आहे. त्यामुळे एसी असो अथवा नॉन एसी रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या ही दरवर्षी वाढत असते. त्यासाठी प्रवास सोयीचा व सुखकर व्हावा यासाठी भारतीय रेल्वे सज्ज झाली आहे. असे म्हणायला हरकत नाही.