आता ट्रेन निघण्याच्या अर्धा तास अगोदरही बुक करता येईल तिकीट; रेल्वेने केला आजपासून नियम लागू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारतीय रेल्वेकडून तिकीट आरक्षण नियमात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. आता ट्रेन निघण्याच्या ५ ते ३० मिनिटे अगोदरही तिकीट बुक करता येईल. दुसरा तक्ता जारी करण्याच्या नियमात बदल करण्यात आला आहे. नव्या नियमानुसार, आता ट्रेनमध्ये तिकीट आरक्षणाचा दुसरा तक्ता (Reservation Chart) प्रस्थानापूर्वी अर्धा तास अगोदर जारी केला जाईल. गेल्या काही महिन्यात कोरोनाचं संकट लक्षात घेता रेल्वेने हा कालावधी दोन तास एवढा केला होता.

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ‘करोना संकटाच्या अगोदर दिशानिर्देशांनुसार पहिला आरक्षण तक्ता ट्रेन निघण्याच्या निर्धारित वेळेच्या चार तास अगोदर तयार केला जायचा, जेणेकरुन उपलब्ध जागा दुसऱ्या तक्त्यात ‘प्रथम या-प्रथम मिळवा’ तत्वानुसार पीआरएस काऊंटर आणि इंटरनेट बुकिंगच्या माध्यमातून दिल्या जाऊ शकतील.’

रेल्वेच्या माहितीनुसार, दुसरा आरक्षण तक्ता ट्रेन निघण्याच्या ३० ते ५ मिनेट अगोदर तयार केली जात होता. अगोदरपासून बुक असलेल्या तिकिटांवरही नियमांनुसार रिफंड देण्याची तरतूद नियमात आहे. करोना संकटाच्या काळात अर्ध्या तासाचा नियम बदलून तो दोन तास एवढा करण्यात आला होता.

प्रवाशांच्या सोयीसाठी विभागीय रेल्वेच्या विनंतीनंतर दोन तासांचा नियम बदलून तो पुन्हा अर्धा तास करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता नव्या नियमानुसार, ऑनलाइन आणि पीआरएस तिकीट काऊंटरवर तिकीट बुकिंग दुसरा आरक्षण तक्ता तयार होण्याच्या अगोदर उपलब्ध होईल. यासाठी सीआरआयएस सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक तो बदल करण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”