हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या दिवाळी आणि छट पूजा उत्सवाला लोकांची रेल्वे गाड्याला रिघ लागली असून अनेकजण या गर्दीमुळे प्लॅन कॅन्सल करतात. त्यामुळे कन्फर्म केलेले तिकीट वाया जाते. मात्र आता असे होणार नाही कारण तुम्ही कन्फर्म केलेलं तिकीट (Indian Railways Ticket) दुसऱ्याला ट्रान्सफर करता येणार आहे. ते कसे ते जाणून घेऊयात.
कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर तिकीट करता येईल ट्रान्सफर
रेल्वेने प्रवाश्यांसाठी ट्रान्सफर तिकिटाचा (Indian Railways Ticket) निर्णय घेत सांगितले की, जर काही कारणास्तव तुमचा बाहेरगावी जाण्याचा प्लॅन कॅन्सल होत असेल तर तुम्ही तुमचे तिकीट कुटुंबातील कोणत्याही सदस्यांच्या नावावर ट्रान्फर करू शकता. ज्यामुळे तुमचे पैसे वाचतील आणि तुमचा प्लॅन कॅन्सल होणार नाही. मात्र हे करत असताना तुमचे तिकीट कन्फर्म असेल तर ते ट्रान्सफर होईल. असेही रेल्वेने सांगितले.
कसे कराल तिकीट ट्रान्सफर? Indian Railways Ticket
रेल्वेचे तिकीट इतर व्यक्तीच्या नावावर ट्रान्फर करण्यासाठी तुम्हाला आधी तुमच्या कन्फर्म तिकिटाची प्रिंट घेऊन रजिस्ट्रेशन काउंटरवर जावे लागणार आहे. तेथे जाऊन ज्या व्यक्तीच्या नावावर तिकीट ट्रान्सफर करायचे आहे त्याचा पासपोर्ट साईज फोटो आणि ओळखपत्र द्यावे लागणार आहे. तसेच त्या व्यक्तीचा तुमच्याशी काय संबंध आहे हे सांगून दोघांचे ओळखपत्र आणि तिकीटाची प्रिंट ही मुख्य आरक्षण पर्यवेक्षकाकडे जमा करावी लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर याची पडताळणी करून संबंधित व्यक्तीच्या नावावर तिकीट ट्रान्फर केले जाईल.
24 तासाच्या आता करावी लागणार विनंती
जर तुम्हाला तुमच्याशी संबंधित व्यक्तीच्या नावावर तिकीट ट्रान्सफर (Indian Railways Ticket) करायचे असेल तर तुम्हाला ते करण्याधी 24 तासाच्या आत तुम्हाला ही विनंती करावी लागणार आहे. असे केले तरच तुमचे तिकीट कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर होऊ शकेल.
कोणाच्या नावावर करता येणार तिकीट ट्रान्फर?
कुटुंबातील सदस्यांच्या नावावर तुम्हाला तिकीट ट्रान्सफर करता येणार आहे. यामध्ये तुम्ही आई-वडील, भावंड, पती-पत्नी आणि मुलगा किंवा मुलगी अश्यांच्या नावावर तिकीट ट्रान्सफर करता येऊ शकणार आहे. म्हणजेच जर संबंधित व्यक्ती तुमच्याशी रक्ताताच्या नात्याची असेल तरच हे शक्य आहे. अन्यथा नाही. असेही रेल्वेने स्पष्ट केले आहे.