भारतीय रेल्वे लाँच करणार Super App; सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळणार

Railway Super App
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वेचे अनेक App आहेत. जसे तिकीट बुक करण्यासाठी, ट्रेनचे लोकेशन बघण्यासाठी आणि अन्य वेगवेगळ्या कामासाठी आपण रेल्वेच्या विविध अँप्सचा वापर करत असतो. आताही आपल्या प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा आणि सर्व सुविधांचा लाभ देता यावा यासाठी रेल्वेकडून सुपर अँप लाँच करण्यात येणार आहे. आता या नवीन ऍप मध्ये नेमके कोणते फिचर असतील? ते कसे काम करतील या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊयात.

रेल्वेचे हें नवीन ऍप ‘सुपर ऍप ‘ (super app) म्हणून ओळखले जाणार आहे. रेल्वेचे लोकेशन, तिकीट बुकिंग यासाठी विविध ऍप उपलब्ध आहेत. मात्र यासाठी वैयक्तिक ऍप वापरकर्त्यांना डाउनलोड करावे लागतात. परंतु आता रेल्वेच्या या सुपर ऍपमुळे तुम्हाला वेगवगेळ्या प्लेफॉर्मवर जाण्याची गरज भासणार नाही. कारण या ऍपमध्ये सर्वच गोष्टी मिळणार आहेत.

काय फिचर असतील यामध्ये?

या नवीन ऍपमध्ये तुम्हाला तिकीट बुकिंग, रेल्वेचे लोकशन पाहणे, जेवण ऑर्डर करणे, तक्रार करणे, UTS, NTES (नॅशनल ट्रेन एन्क्वायरी सिस्टीम), पोर्टरीड, सतर्क, IRCTC रेल कनेक्ट, IRCTC ई-केटरिंग, IRCTC एअर अश्या अनेक सुविधा मिळणार असून याचा फायदा प्रवाश्यांनाही होणार आहे.

90 कोटींची केली तरतूद

या नवीन ऍपसाठी रेल्वे मंत्रालयाकडून तब्बल 90 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या एकाच ऍपमध्ये सर्व गोष्टी समाविष्ट असल्यामुळे त्याचा फायदा प्रवाश्यांना होणार आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी असल्यामुळे प्रवाश्यांना हव्या त्या सुविधा देण्यासाठी रेल्वेकडून नवं नवीन सुविधेवर काम केले जात आहे. सध्या रेल्वेच्या तिकीट बुकिंगची संख्या ही 5,60,000 एवढी आहे.