Indian Railways Veg Meal Price : ट्रेनमध्ये जेवण कितीला मिळणार? रेल्वे मंत्रालयाने मेनूकार्डच दाखवलं

Indian Railways Veg Meal Price
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Indian Railways Veg Meal Price । भारतात रेल्वेचं जाळं सर्वात मोठं आहे. देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात थेट रेल्वे सेवा उपलब्ध असल्याने खास करून लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वेला सर्वच जण प्राधान्य देत असतात. आरामदायी आणि कमी खर्चात प्रवास होत असल्याने ट्रेनला तुडुंब गर्दी नेहमीच बघायला मिळते. अनेकदा प्रवाशांना रेल्वे पॅन्ट्री किंवा स्टॉपेज स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर असलेल्या विक्रेत्यांकडून अन्न घ्यावे लागते. मात्र हे अन्न किती रुपयांना मिळते हे तुम्हाला माहितेय का? चिंता करू नका, रेल्वे मंत्रालयाने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

खरं तर, लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान, अनेक प्रवासी बाहेरचे अन्न खाऊन प्रवास पूर्ण करतात, कारण त्यांच्याकडे म्हणावे असे पर्याय नसतात. अशा परिस्थितीत, काही प्रवासी ट्रेन पॅन्ट्रीमधून अन्न किंवा प्लॅटफॉर्मवरून जेवण खरेदी (Indian Railways Veg Meal Price) करतात. बहुतेक प्रवाशांना रेल्वेच्या नियमांची माहिती नसते, म्हणजेच जेवण किती रुपयांना मिळते हे सुद्धा प्रवाशांना कधी कधी माहित नसत. याच पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने तुमच्या माहितीसाठी एक महत्त्वाची पोस्ट शेअर केली आहे.

काय आहे रेल्वे मंत्रालयाची पोस्ट – Indian Railways Veg Meal Price

रेल्वे मंत्रालयानं आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक माहिती शेअर केली आहे. स्टेशनवर उपलब्ध असलेल्या व्हेज मीलची (स्टँडर्ड कॅसरोल) किंमत ७० रुपये आहे, तर ट्रेनमध्ये त्याची किंमत ८० रुपये आहे. रेल्वे मंत्रालयानं सांगितले की, व्हेज मीलच्या (स्टँडर्ड कॅसरोल) मेनूमध्ये साधा भात (१५० ग्रॅम), जाड डाळ किंवा सांबार (१५० ग्रॅम), दही (८० ग्रॅम), २ पराठे किंवा ४ रोट्या (१०० ग्रॅम), भाजी (१०० ग्रॅम) आणि लोणच्याचं एक पॅकेट (१२ ग्रॅम) यांचा समावेश आहे.

जर विक्रेत्यांनी जेवणाच्या किंमतीत किंवा मेनूमध्ये समाविष्ट असलेल्या अन्नाच्या प्रमाणात किंवा गुणवत्तेत काही चूक केली तर तुम्ही त्यांना जाब विचारू शकता किंवा सवाल करू शकता. एवढंच नव्हे तर रेल्वेचे हे मेनूकार्ड दाखवू शकता. तरीही, जर संबंधित विक्रेत्यांनी तुमची मागणी मान्य करण्यास नकार दिला तर तुम्ही रेल्वेच्या विहित तक्रार माध्यमांद्वारे तक्रार करू शकता.